कोल्हारे गावातील मोऱ्यांचे सुरू असलेले काम निकृष्ट

By Admin | Updated: June 29, 2016 02:45 IST2016-06-29T02:45:11+5:302016-06-29T02:45:11+5:30

तालुक्यातील कोल्हारे गावात सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारामध्ये सिमेंट मोऱ्या टाकण्याचे काम सुरू आहे.

The work that started in Kolhare village is worthless | कोल्हारे गावातील मोऱ्यांचे सुरू असलेले काम निकृष्ट

कोल्हारे गावातील मोऱ्यांचे सुरू असलेले काम निकृष्ट


कर्जत : तालुक्यातील कोल्हारे गावात सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारामध्ये सिमेंट मोऱ्या टाकण्याचे काम सुरू आहे. गावातील सांडपाणी नाल्यात जाण्यासाठी जुन्या गटारामध्ये मोऱ्या टाकण्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्र ार ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समितीकडे केली आहे.
कोल्हारे गावात जुन्या गटारामध्ये सिमेंट मोऱ्या टाकून सांडपाणी थेट नाल्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने सुरू केला आहे. हे काम करताना जुन्या असलेल्या मोडक्या तोडक्या गटाराची प्रथम दुरु स्ती होणे आवश्यक आहे. मात्र जुन्या गटाराची दुरु स्ती न करता त्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या कोल्हारे ग्रामपंचायतीसमोरील या गटारात सिमेंट पाइप टाकून गटार बंदिस्त करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र सुरू असलेले गटाराचे बंदिस्त काम करताना आजूबाजूला सिमेंटने आधी गटार बांधणे आवश्यक असताना त्या स्थितीत पाइप टाकले जात आहेत. दुसरीकडे आजूबाजूची माती गटारात टाकून पाइप टाकण्यात येत असल्याचा आरोप कोल्हारे गावातील ग्रामस्थ विजय हजारे यांनी कर्जत पंचायत समितीला दिलेल्या
तक्र ारीत केला आहे.
विजय हजारे यांनी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हात्रे यांना तक्र ारीचे निवेदन देताना कोल्हारे गावात बांधलेले गटार फोडून काढल्यास निकृष्ट काम कसे असते हे दिसून येईल. त्यासाठी कर्जत पंचायत समितीने चौकशी करून संबंधित काम पुढे सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
>काम सुरु असताना अधिकारी नव्हते उपस्थित
काम सुरू असताना कर्जत पंचायत समितीचा कोणताही अधिकारी तेथे उपस्थित नसल्याने असे निकृष्ट काम झाले असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे गटाराचे झालेले काम कर्जत पंचायत समिती फोडून पाहणार की झालेल्या कामाचे बिल अदा करते, याकडे कोल्हारे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: The work that started in Kolhare village is worthless