लोकमतच्या जलमित्र अभियानात महिलांचा सहभाग

By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:05+5:302016-06-07T07:43:05+5:30

लोकमत जलमित्र अभियानास मनोर आणि टेण परिसरातील मुस्लिम व अन्य महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Women's participation in Lokmat's Jummiter Mission | लोकमतच्या जलमित्र अभियानात महिलांचा सहभाग

लोकमतच्या जलमित्र अभियानात महिलांचा सहभाग


मनोर : लोकमत जलमित्र अभियानास मनोर आणि टेण परिसरातील मुस्लिम व अन्य महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी झालेल्या मेळाव्यास त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी आपल्या परिवारात व परिसरात जलबचत करण्याचा निर्धार त्यांनी केला. लोकमतच्या जलमित्र अभियानाच्या मस्तान नाका येथील कुमार पार्कमधील कार्यक्रमास त्यांनी उत्साही उपस्थिती दर्शविली. लोकमतचे निवासी संपादक नंदकुमार टेणी यांनी यावेळी पाणी बचतीचे विविध उपाय सांगितले. रविवार अथवा आठवड्यातील एखादा दिवस हा महिलांनी आपल्या इमारतीतील नळांच्या तोट्या आणि जोडण्या यांच्या तपासणीसाठी द्यावा, त्यातूनही मोठी बचत घडून येईल, असे सांगितले. पाड्यातील सार्वजनिक नळांवर वाया जाणारे पाणी कसे थांबविता येईल, असा प्रश्न त्यांनी विचारला असता या नळांवर अटेंडंट ठेवणे हा इलाज सुचविला गेला. त्याचा पगार अथवा मानधन बचत झालेल्या पाण्याच्या बिलाच्या रकमेतून देता येईल. असेही स्पष्ट केले गेले. मेहेर निगार बेग, निमा लोखंडे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली की लोकमत जलमित्र अभियानातर्फे आम्हाला मिळालेली माहिती उपयुक्त आहे. लोकमतने तयार केलेल्या पोस्टर्सची डिझाईन या महिलांना उपलब्ध करून देण्यात आली. त्यांचा प्रसार त्या करणार आहेत. लोकमत जलिमत्र अभियान सहभागी झालेल्या महिला मेहर,निगार बेग , नीमा लोखंडे , फरीन आझम शेख , सेहरबानू काझी, शकीला खान, शमीम खान , जबींन मेमन , आश्मा शेख , शाहिमा संतू ,रजिया अन्सारी , सेहरबानू तनवीर काझी व इतर महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Women's participation in Lokmat's Jummiter Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.