महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:12 IST2025-11-04T14:11:24+5:302025-11-04T14:12:58+5:30
Maharashtra News: भारतीय महिला क्रिकेट संघाचे राज्य सरकारकडून अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील संघातील खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. तसेच, पुणे आणि अहमदनगर (अहिल्यानगर) भागांत वाढलेल्या बिबट्यांच्या (Leopard) धोक्यावरही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे राज्य सरकारकडून अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ज्या खेळाडूंनी विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व केले, त्यांना राज्य सरकारकडून रोख पारितोषिक देण्यात येईल.स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचे यात नाव आहे.
पुणे, अहमदनगरमध्ये बिबट्यांचा वाढता धोका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि अहमदनगर परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. पुण्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे आणि अहमदनगर भागात बिबट्यांची संख्या सुमारे १,३०० च्या घरात पोहोचली आहे. बिबट्यांसंदर्भातला रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील प्रकल्पांचा आढावा
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतल्याची माहिती दिली. एकूण २१ महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पाची कामे नियोजित तारखेनुसार पूर्ण झाली नाहीत, अशा कंत्राटदारांना बोलावून त्यांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या. कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, यासाठी त्यांना तात्काळ सूचना (तंबी) देण्यात आल्या आहेत.