शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा व घराच्या नोंदीवर महिलांची पाटी कोरीच

By admin | Updated: June 9, 2015 00:30 IST

आश्‍वासन हवेतच; चिचपूर ग्रामपंचायतचा ठरावही बेदखल.

राजेश शेगोकार/बुलडाणा : महिलांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांना समान हक्क देऊन शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ५0 टक्के जागा राखीव केल्या. मात्र सातबार्‍यावर महिलांचे नाव तसेच घरांची नोंद पती-पत्नी या दोघांच्या नावे करण्याबाबत शासन स्तरावर कमालीची उदासीनता दिसून येते.बुलडाणा जिलतील मोताळा तालुक्यातील चिचपूर या ग्रामपंचायतने सातबार्‍यावर महिलांच्या नावाची नोंद घेण्याचा ठराव डिसेंबर २00८ मध्ये घेतला. हा ठराव सूचविणार्‍या तत्कालीन उपसरपंच शकुंतला मापारी यांचे राज्य शासनाकडून कौतुकही झाले. तत्कालीन महसूल मंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी हा निर्णय राज्यभर लागू करू, असे हिवाळी अधिवेशनात जाहिरही केले होते. प्रत्यक्षात मात्र तसा आदेश निघालाच नाही व सातबार्‍यावर अर्धांगिनीचे नाव आले नाही. शासनाने तसा आदेशच काढला नसल्याने तलाठीही सातबार्‍यावर दोघांच्या नावाची नोंद घेत नाही.असाच प्रकार घराची नोंद करताना महिलेचे नाव लावण्याबाबत झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने २0 नोव्हेंबर २00३ रोजी परिपत्रक काढून घराची नोंद करताना पती पत्नी दोघांच्या नावाने करावी असे सूचित केले; मात्र या आदेशाचीही राज्यभरात कुठेही अंमलबजावणी झालेली नसल्याचे आढळूल आले आहे. पतीच्या निधनानंतर पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्थापित करताना महिलांना अनेक कायदेशीर अडचणीना समोर जावे लागते. आधीच पती-पत्नीचे हक्क महसूली दफ्तरात असतील, तर अशा अडचणी येऊ नये, हा यामागे शासनाचा उद्देश आहे. प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायतींकडे हे परिपत्रक पोहचलेच नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. महिला सक्षमीकरणाबाबत हे दोन्ही निर्णय महत्वपूर्ण असून, याबाबत ग्रामविकास खात्याने पुढाकार घेण्याची गरज आहे.