शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

वाघांच्या संरक्षणाला महिला फौज, शिकाऱ्यांसाठी कर्दनकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 08:08 IST

शिकारी कधी व कुठून लक्ष्य साधतील सांगता येत नाही. पण या फासात त्यांनाच अडकवण्यात तरुणींची ही फौज प्रवीण आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा असो वा नवेगाव नागझिऱ्याचे मंगेझरी या अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्याची भीती त्या कदापि बाळगत नाहीत.

सविता देव हरकरे

नागपूर : महिलांनी सर्वच क्षेत्रात शिखरे पादांक्रांत केली आहेत. अशात वनविभागातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) वनवाघिणींनीवाघांच्या संरक्षणाचा विडा उचलून आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. घनदाट जंगलात हिंस्त्र श्वापदांच्या सानिध्यात निडरपणे, जीव धोक्यात घालत त्यांची वाटचाल सुरू आहे. एकाच ध्येयाच्या दिशेने... देशाची वनसंपत्ती आणि वाघांचे रक्षण. शिकारी कधी व कुठून लक्ष्य साधतील सांगता येत नाही. पण या फासात त्यांनाच अडकवण्यात तरुणींची ही फौज प्रवीण आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा असो वा नवेगाव नागझिऱ्याचे मंगेझरी या अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्याची भीती त्या कदापि बाळगत नाहीत. प्राजक्ता उमरे, वर्षा जगताप, कांचन गजभिये, साधना निकुरे, प्रणिता आणि त्यांच्या सहकारी वने आणि वन्यजीवांवर वक्रदृष्टी टाकणाºया प्रवृत्तींविरुद्ध संपूर्ण ताकदीने लढा देत आहेत.

पहाटे ३ वाजल्यापासून गस्तनवेगाव नागझिरा एसटीपीएफच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नांगरे सांगतात, पहाटे तीन वाजतापासून ‘शिफ्ट’ असतात. ८ तास १० ते १५ किमीचा पल्ला पायी गाठायचा असतो. गस्तीदरम्यान प्रत्येक क्षण सतर्क राहून अवैध घटनांचा मागोवा घेणे, वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत त्यांच्या नोंदी करणे. बाह्य सीमेवर गस्त घालताना जंगलालगतच्या गावात पोलीस पाटलाची भेट घेणे, लोकांशी संवाद साधून वने व वन्यजीवांचे महत्त्व पटवून देणे, आठवडी बाजारात गुप्त तपास करणे अशी अत्यंत महत्त्वाची कामे हे पथक पार पाडत असते. आज ३३ टक्के आरक्षण असताना एसटीपीएफमध्ये त्यांची संख्या ५० टक्क्यांवर पोहोचली आहे.४ विशेष व्याघ्र संरक्षण दलातील वनवाघिणीमहाराष्टÑात ४ विशेष व्याघ्र संरक्षण दल आहेत. प्रत्येक दलात किमान २६ वनरक्षक व ७ वननिरीक्षक महिला आहेत. सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी या महत्त्वाच्या जबाबदाºयाही त्या पार पाडत आहेत.विशेष मोहिमांमध्ये सक्रिय व्याघ्र संरक्षण दलांनी स्थापनेपासून आजवर अनेक विशेष मोहिमा यशस्वी केल्या. त्यात महिलांचा वाटा महत्त्वाचा ठरला. पेंचमधील मासेमारीचा प्रश्न, ताडोबातील मानव-वन्यजीव संघर्षविरोधी मोहीम, बचाव पथके, विजेद्वारे वन्यजीवांच्या शिकारीविरोधातील कारवाईत या वनवाघिणी आघाडीवर असतात.कठोर प्रशिक्षणविशेष व्याघ्र संरक्षण दलात सहभागी होताना अनेक अवघड चाचण्यांना सामोरे जावे लागते. निवडीनंतरही सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण असते. अनुशासन, संघटन, शारीरिक क्षमता सिद्ध करण्यास व्यायामाशिवाय वेपन ट्रेनिंग, साइट सिक्युरिटी टायगर मॉनिटरिंग, असे अनेक टप्पे असतात. समाजातील दुष्प्रवृत्ती, प्रथा यांच्याशी लढा देऊन अनेक महिला पुढे जात आहेत. यशस्वी होत आहेत. अशा महिलांची ही खास मालिका... तुमच्याही आसपास अशा महिला असतील तर त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. त्यातील काही निवडक महिलांचा लढा आम्ही प्रसिद्ध करू. माहिती पाठवण्यासाठी इमेल : ु१ंल्लस्रिं१३ल्ली१@’ङ्म‘ें३.ूङ्मे

टॅग्स :WomenमहिलाSoldierसैनिकTigerवाघ