महिला वाहकास प्रवाशांची मारहाण
By Admin | Updated: April 1, 2015 02:22 IST2015-04-01T02:22:57+5:302015-04-01T02:22:57+5:30
कल्याण रोड बायपास ते भिवंडी स्थानक प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांनी महिला वाहकास मारहाण करीत तिचा विनयभंग केला.

महिला वाहकास प्रवाशांची मारहाण
भिवंडी : कल्याण रोड बायपास ते भिवंडी स्थानक प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांनी महिला वाहकास मारहाण करीत तिचा विनयभंग केला.
माणकोली भिवंडी या बसमध्ये साईबाबा बसथांब्यावरून अश्फाक अब्दुल हमीद शेख व त्याचा भाऊ असे दोन प्रवासी चढले. तिकिटाचे दोन रुपये कमी दिले. मागणी केली असता अश्लील वर्तन केले. मदत करणाऱ्यांनाही मारहाण केली. शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अश्फाक शेख व त्याच्या भावास अटक केली आहे.