पुण्यात रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून महिला डॉक्टरची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 14:01 IST2017-08-11T13:59:45+5:302017-08-11T14:01:12+5:30
पुण्यातील सुखसागरनगर परिसरात एका महिला डॉक्टरने आजारपणाला कंटाळून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

पुण्यात रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून महिला डॉक्टरची आत्महत्या
पुणे, दि. 11 - पुण्यातील सुखसागरनगर परिसरात एका महिला डॉक्टरने आजारपणाला कंटाळून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आज (गुरुवार) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून आजारणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
डॉ. इंदू शाम डोंगरे (रा. साईनगर, सुखसागरनगर, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास कोंढवा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आजारपणाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली असावी, असा प्राथिमिक अंदाज कोंढवा पोलिसांनी वर्तवला आहे.
मयत डॉ. इंदू डोंगरे आणि त्यांचे पती डॉ. शाम डोंगरे यांचे सुखसागरनगर येथे स्वत:चे गजानन हॉस्पिटल आहे. मागील काही दिवसांपासून इंदू मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेत होत्या. या उपचारांना कंटाळूनच त्यांनी गुरूवारी सायंकाळी गजानन रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर उडी मारली. त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.