लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
By Admin | Updated: August 8, 2016 17:43 IST2016-08-08T17:43:18+5:302016-08-08T17:43:18+5:30
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी रविवार, ७ ऑगस्ट रोजी एका जणाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
>ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड, दि. 08 - लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी रविवार, ७ ऑगस्ट रोजी एका जणाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने तक्रारीत नमुद केले की, येथील गौतमनगरमधील कुमार लीलाधर कापशीकर याने लग्नाचे आमिष दाखवून आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नासाठी तगादा लावला असता त्याने टाळाटाळ केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देवून वारंवार शारीरिक अत्याचार केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कुमार कापशीकर याच्या विरूद्ध कलम ३७६ (१) (२) (के) (एन) २९४, ४१७ भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान पायघन करीत आहे.