लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:37 IST2025-04-17T14:35:17+5:302025-04-17T14:37:43+5:30

लोणावळा रेल्वे रुळाजवळ एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली.

Womans Body Found In Pink Suitcase Near Lonavala Railway Tracks | लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!

लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!

मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील मंकी हिल परिसरात रेल्वे रुळाजवळ एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. याबाबात माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.

मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर मंकी हिल पॉइंटजवळ एका प्रवाशाला गुलाबी रंगाची सुटकेस दिसली. प्रवाशाला भलताच संशय आल्याने त्याने ताबडतोब रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे पोलिसांनी शाहनिशा करण्यासाठी सुटकेस उघडून पाहिली असता एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

मृतदेहाची स्थिती पाहता पोलिसांना हा खून असल्याचा संशय आहे. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण निश्चित करणे शक्य होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Womans Body Found In Pink Suitcase Near Lonavala Railway Tracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.