Anant Garje Wife Gauri Palwe: "गौरीची मैत्रिणी सांगत होत्या की, ती रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. एक मैत्रीण तिला दडी वर्षांपासून ओळखत आहे. पण, फेब्रुवारीपासून आतापर्यंत तिने गौरीच्या शरीरावर अनेकदा मारहाणीच्या खुणा बघितल्या. म्हणजे तिल मारहाण व्हायची", असे सांगत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनंत गर्जे यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे.
अंजली दमानिया यांनी मयत डॉक्टर गौरी पालवे यांच्या आईवडिलांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, "ते आधी बीडीडी चाळीत राहत होते. जेव्हा त्यांना मोठ्या बहुमजली इमारतीमध्ये हलवण्यात आले. तेव्हा सामानाची आवराआवर करताना गौरीला काही कागदपत्रे मिळाली. त्यामध्ये एक कागद होता. त्यावर किरण इंगळे असे एका महिलेचे नाव होते."
पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव
"तिला गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्या कागदावर किरण इंगळे हिच्या पतीचे नाव अनंत गर्जे असे आहे. त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाले. असे गौरीच्या आईवडिलांनी सांगितले आहे", अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.
नणंद म्हणाली, आम्ही त्याचे दुसरे लग्न करू
"गौरीला समजले की तो अजूनही चॅटिंग करत आहे. त्यामुळे ती तणावात होती. गौरीने अनंतची नणंद शीतलकडेही तक्रार केली होती. पण, नणंद तिला म्हणाली की, तुला राहायचे असेल, तर त्याच्यासोबत राहा. नाहीतर आम्ही त्याचे दुसरे लग्न करून देतो. गौरी याबद्दल तिच्या आईवडिलांना बोलली होती. तिने अनंतच्या मोबाईलमधील चॅटिंगचे स्क्रीनशॉटही तिच्या वडिलांना पाठवले होते", असे अंजली दमानियांनी सांगितले.
पंकजा मुंडेंनी मुलीसाठी उभे राहावे
अंजली दमानिया म्हणाल्या की, "पंकजा मुंडेंनी आता एका मुलीसाठी उभे राहावे. सांगावे की हा माझा पीए असला तरी त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. त्याची चौकशी नीट होऊन, त्याने गुन्हा केला असेल, तर कारवाई करावी", असे आवाहन दमानियांनी पंकजा मुंडेंना केले आहे.