भिंत कोसळून विद्यार्थिनी ठार

By Admin | Updated: July 10, 2015 02:32 IST2015-07-10T02:32:19+5:302015-07-10T02:32:19+5:30

तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शौचालयाची भिंत कोसळून श्रावणी लक्ष्मीकांत जोशी (११) हिचा मृत्यू झाला,

The woman killed the wall collapsed | भिंत कोसळून विद्यार्थिनी ठार

भिंत कोसळून विद्यार्थिनी ठार

मानवत (जि़ परभणी) : तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शौचालयाची भिंत कोसळून श्रावणी लक्ष्मीकांत जोशी (११) हिचा मृत्यू झाला, तर अन्य एक विद्यार्थिनी जखमी झाली. गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मंगरुळ येथील प्राथमिक शाळा दोन सत्रात भरते. दुपारच्या सत्रात मध्यंतरानंतर दीड वाजेच्या सुमारास जोराचा वारा सुटल्याने शौचालयाची भिंत कोसळली.
यात इयत्ता पाचवीतील श्रावणीच्या अंगावर भिंत पडल्याने ती जागीच मरण पावली. बाजूस असणाऱ्या भारती आबासाहेब निलवर्ण (१२) हिच्या पायाला दुखापत झाली असून, तिला परभणी येथे हलविले. (प्रतिनिधी)
-----
मृतदेह घेण्यास नकार
श्रावणीच्या नातेवाईकांनी काही काळ मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला व दोषींवर कारवाईची मागणी केली. शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे आणि इतरांनी नातेवाईकांची समजून काढून कारवाई करु, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Web Title: The woman killed the wall collapsed