शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

 शिवसेनेच्या सोबतीशिवाय विजय मिळवणे कठीण, मुख्यमंत्री चिंतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 19:43 IST

उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत झालेला पराभव, देशपातळीवर विरोधी पक्षांचे होत असलेले ऐक्य आणि महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा यामुळे केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांना घाम फुटला आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत झालेला पराभव, देशपातळीवर विरोधी पक्षांचे होत असलेले ऐक्य आणि महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा यामुळे केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांना घाम फुटला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय विजय मिळवणे कठीण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र शिवसेनेसोबत युती होवो वा न होवो, कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी  सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले. नुकतीच राज्यातील दोन मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतील दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपा नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आगामी निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय असेल, याचा अंदाज बांधण्यात आला. शिवसेनेशिवाय निवडणूक लढवण्याची वेळ आली तर पक्षाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेची सोबत आवश्यक असेल, असे सांगितले. तसेच शिवसेनेसोबत युती न झाल्यास कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यास तयार राहावे, असेही त्यांनी सांगितले. भाजपाने शिवसेनेसोबत युती नसतानाही पालघरमध्ये विजय मिळवला होता. भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी या विजयाचाही उल्लेख केला. मात्र  पालघरमध्ये शिवसेनेचे आव्हान परतवून लावताना भाजपाची दमछाक झाली होती. शिवसेनेसोबतच्या युतीबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे विचारणा केली असता दानवेंनी शिवसेना अद्यापही आमच्यासोबत सरकारमध्ये आहे. एका पोटनिवडणुकीत ते आमच्या विरोधात लढले आहेत. मात्र चर्चेची शक्यता अद्यापही कायम असल्याचे दानवे म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण