शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

महाराष्ट्राच्या आशीर्वादाने ‘अब की बार चार सौ पार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 06:27 IST

पंतप्रधान मोदी यांनी यवतमाळातून फुंकला लोकसभा निवडणुकीचा बिगुल, वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाइनसह प्रवासी रेल्वेचा श्रीगणेशा

- विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यापूर्वी दोन लोकसभा निवडणुकांच्या अगोदर मी यवतमाळमध्ये आलो होतो. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा यवतमाळकरांच्या भेटीला आलो आहे. मागील १० वर्षांत देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात यशस्वी झालो, त्याच पुण्याईच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीत एनडीएला तुम्ही ४०० पेक्षा अधिक जागा द्याल. ‘अब की बार चारसौ पार’ अशी घोषणा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. यावेळी त्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकासकामांचे लोकार्पण तसेच विविध योजनांचे निधी वितरणही पार पडले. 

यवतमाळमधील नागपूर रोडवरील डोर्ली येथे बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाइन आणि प्रवासी रेल्वेसह इतर विविध योजनांचा श्रीगणेशा करण्यात आला. तसेच, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता वितरित करण्यात आला. 

२३ मिनिटे ५४ सेकंदांच्या भाषणाने जिंकली सभाnपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंचावर ६:०२ वाजता आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजाची पगडी तसेच स्वयंसहायता गटाने बनविलेल्या वस्तू भेट देऊन त्यांचे स्वागत केले. nत्यानंतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर मराठीमध्ये मोदींनी भाषणाला सुरुवात केली. २३ मिनिटे ५४ सेकंदाच्या भाषणात विकासाच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी आल्याचे सांगत पंतप्रधानांनी सभा जिंकली.

‘शेवटच्या श्वासापर्यंत देशहितासाठी कार्यरत राहू’nछत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी महापुरुषांच्या कार्यांला उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे झाली आहेत. nराज्यभिषेकानंतरही शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी स्वराज्याला बळकटी देण्यासाठी सतत प्रयत्न केले. आम्हीही शेवटच्या श्वासापर्यंत देशहितासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही पंतप्रधान माेदींनी दिली.

एक रुपयांपैकी १५ पैसेच पोहोचतnमोदी म्हणाले, पूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. विशेष म्हणजे कृषिमंत्री महाराष्ट्राचे असूनही केंद्रातून मंजूर एक रुपयांपैकी केवळ १५ पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असे. म्हणजे मी आता २१ हजार करोड रुपये लाभार्थ्यांच्या थेट खात्यात टाकले आहेत. nपूर्वीचे सरकार असते तर यातील १८ हजार कोटी रुपयांची मध्येच लूट झाली असती, अशी घणाघाती टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली. nविद्यमान सरकार लाभार्थ्याला पूर्ण हक्क देणारे असून हीच मोदींची गॅरंटी आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

राज्यात सर्वाधिक याेजना पूर्णपूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या शंभर सिंचन योजना बासनात गुंडाळल्या होत्या. त्यातील ६० योजना आम्ही पूर्ण केल्या. त्यातही महाराष्ट्रातील योजना सर्वाधिक आहेत.या योजना रखडल्याने लाभार्थी विकासापासून वंचित राहिले. त्यांच्या पापाची शिक्षा या पिढीला भोगावी लागली.आता मात्र तसे होणार नाही. गेल्या १० वर्षांपासून भाजप सरकारने गोरगरीब, शेतकरी, तरुण आणि महिला या घटकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची नवी दिशा दाखविली असल्याचे मोदी म्हणाले.  

यांची होती उपस्थितीया प्रसंगी मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागसवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील, आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार संदीप धुर्वे, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा