झाईत किनारा स्वच्छता!
By Admin | Updated: September 20, 2016 03:41 IST2016-09-20T03:41:05+5:302016-09-20T03:41:05+5:30
निर्मल सागर तट अभियानाचा शुभारंभ सोमवार, १९ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई गावातून करण्यात आला.

झाईत किनारा स्वच्छता!
अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागर तट अभियानाचा शुभारंभ सोमवार, १९ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई गावातून करण्यात आला. या वेळी झाई सरपंच जनी प्रकाश सांबर, उपसरपंच अर्जुन वांगड उपस्थित होते.
मेरीटाइम बोर्डाचे बंदर निरिक्षक अभिजीत जाधव, सुधीर जंगम, श्रीधर मोरे, सुभाष औणकर, प्रसाद पारकर, चौकीदार रविंद्र अंसुरकर, नितिन कोळी तसेच आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका दिपा पाटील, झाई मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष धर्मेन माच्छी, सचिव किशोर ठाकूर, सदस्य विनोद माच्छी, मांगेला समाज मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष सहदेव दवणे, सचिव सुरेश दवणे, पंचायत समिती सदस्य प्रकाश सांबर, ग्रामपंचायत सदस्य विनित राऊत, माजी सदस्या उषाबेन माच्छी, कृषी अधिकारी कडू स्थानिक मच्छीमार, ग्रामस्थ, महिला, लाखाणी विद्यालयाचे शिक्षक मनीष जोंधळेकर, स्मिता सावे आणि विद्यार्थी अभियानात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जम्मू काश्मीर मधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बंदर निरिक्षक श्रीधर मोरे यानी प्रास्ताविक भाषणातून अभियानाची माहिती दिली. त्यानंतर किनारा स्वच्छ ठेऊन पुरस्कार प्राप्त करण्याचे आवाहन केले. झाई गावातील विद्यार्थी, महिला व मच्छीमारांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत सहकार्य केले. झाई गाव मासेमारीसह पर्यटनात अग्रेसर झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. या स्वच्छता मोहिमेचे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे नवनीत निजाई यांनी सांगितले. कॅप्टन संजय शर्मा यांच्या मार्गर्शनाखाली मोहीम यशस्विरित्या पार पडली. १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर हा निर्मल ग्राम अभियानाचा कालावधी आहे. त्यानुसार २० सप्टेंबर पासून अनुक्रमे बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड आणि 28 सप्टेंबरला डहाणूच्या समुद्रकिनारी राबविले जाणार असल्याची माहिती बंदर विभागाने दिली.
>जुहू येथे झाला शुभारंभ
महाराष्ट्र राज्याला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून किनारा स्वच्छतेसाठी शासनाने निर्मल सागर तट अभियान महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून हाती घेतले आहे.
शनिवार १७ सप्टेंबर रोजी जुहू बीच येथे बंदर खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई या मासेमारी गावातून १९ सप्टेंबर रोजी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.