स्वबळावर 114 जागा जिंकून दाखवू - सुभाष देसाई
By Admin | Updated: January 26, 2017 18:39 IST2017-01-26T18:32:14+5:302017-01-26T18:39:48+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढल्यास 114 जागा जिंकून दाखवू असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गोरेगाव येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले आहे

स्वबळावर 114 जागा जिंकून दाखवू - सुभाष देसाई
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढल्यास 114 जागा जिंकून दाखवू, असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गोरेगाव येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला आहे. शिवसेना पालिका निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल. मुंबई महापालिकेत भाजपाने 114 जागांची मागणी केली, त्यामधील 40 जागांवर शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत.
शिवसेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख, गटप्रमुखांचा मेळावा गोरेगावच्या एनएसई ग्राऊंडवर सुरू आहे. यावेळी बोलताना देसाई यांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना शिवसेनेचा वचननामा आणि अहवाल घेऊन घरोघरी जाण्याचे आवाहन केले आहे.
कार्यकर्त्यांची इच्छा असेपर्यंतच मंत्रिपदावर राहू, तीन पायांची शर्यत किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सेना-भाजपाच्या युतीवर बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास आम्ही सर्व 12 मंत्री आपल्या बॅगा घेऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडू.