शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उद्या होणार? सुनेत्रा पवारांच्या नावावर चर्चा; बैठकीत निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:15 IST

अनेक लोकांच्या सूचना पुढे येत आहेत. त्या रास्त आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद द्यावे अशी अनेकांची मागणी आहे. ते चूक आहे असं वाटत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

मुंबई - अजित पवार यांच्या निधनाला ३ दिवस उलटले नाहीत तोवर राज्यात उपमुख्यमंत्रिपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला. गुरुवारी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नावाची उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरू झाली. सुरुवातीला मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही मागणी केली. त्यानंतर आता त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. 

आज सकाळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांचा समावेश होता. या भेटीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, अजितदादा गेले, ते प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहिले त्यानंतर झोप उडाली आहे. मात्र शेवटी Show Must Go On असं आहे. त्यामुळे कुणातरी ही सगळी जबाबदारी पक्ष असेल, सरकार असेल हे पुढे चालवायला हवे. त्यामुळे उद्या शनिवारी विधिमंडळाचे जे सदस्य आहेत त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात विधिमंडळ नेतेपद जे अजितदादांकडे होते. त्या पदाबाबत निर्णय होईल असं त्यांनी सांगितले.

तसेच अनेक लोकांच्या सूचना पुढे येत आहेत. त्या रास्त आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद द्यावे अशी अनेकांची मागणी आहे. ते चूक आहे असं वाटत नाही. ते करायला पाहिजे पण शेवटी निर्णय हा पक्षाच्या बैठकीत होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माहिती नाही. सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे त्याची कामे पुढे नेण्यावर लक्ष देत आहोत. उपमुख्यमंत्रिपदाची जागा रिक्त आहे. ती ताबोडतोब सुनेत्रा वहिनींच्या द्वारे कशी भरता येईल त्याकडे आमचे सगळ्यांचे लक्ष आहे. बाकीचे पुढे बघता येईल. पक्षात लोक जे ठरवतील त्याप्रमाणे होईल असंही छगन भुजबळांनी म्हटलं.

दरम्यान, उद्या विधिमंडळ सदस्यांची बैठक आहे. विधिमंडळ पक्ष नेता ठरवण्याचा निर्णय त्यात होईल. कदाचित एकमत झाले आणि निवड झाली तर उद्याच्या उद्या शपथविधीही होऊ शकतो अशीही माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या रुपाने पहिलीच महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.    

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar likely as Deputy CM; decision expected soon.

Web Summary : Following Ajit Pawar's death, political activity for Deputy CM post intensifies. Sunetra Pawar's name is under consideration. A legislative meeting will decide the leader; swearing-in possible Saturday.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारChhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस