शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

संपामुळे पुढचे तीन दिवस खरंच वीजपुरवठा खंडीत राहणार? महावितरणने स्पष्टच सांगितलं, ग्राहकांना केलं असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 22:12 IST

Maharashtra Electricity Strike: राज्यातील ८६ हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी व ४२ हजार कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षकांनी ७२ तासांचा संप पुकारला आहे. परिणामी, पुढचे तीन दिवस राज्यातील वीजपुरवठा खंडीत राहिल, अशा प्रकराचा मेसेजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबई -  वीज वितरणाच्या खासगीकरणाला विरोध यासह अदानी वीज कंपनीला वितरणाचा परवाना देऊ नये आदी मागण्यांसाठी ४ जानेवारीपासून (मंगळवारी रात्री १२ वाजेपासून) राज्यातील ८६ हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी व ४२ हजार कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षकांनी ७२ तासांचा संप पुकारला आहे. परिणामी, राज्यभरातील वीज यंत्रणा कोलमडून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच या संपामुळे  पुढचे तीन दिवस राज्यातील वीजपुरवठा खंडीत राहिल, अशा प्रकराचा मेसेजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने महत्त्वपूर्ण माहिती देत राज्यभरातील वीज ग्राहकांसह सर्वसामान्यांना आवाहन केलं आहे. 

वीज कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन करताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी राज्यातील वीजपुरवठा अखंडित राहील, अशी माहिती दिली आहे. राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही.  वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित राहील याची खात्री बाळगावी, असे विश्वास पाठक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये त्यांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नाहीत. तर जनतेच्या मालकीचा वीज उद्योग टिकला पाहिजे. तो भांडवलदारांना विकता कामा नये. भांडवलदार नफा कमविण्याच्या उद्देशाने वीज वितरण क्षेत्रात येत आहे. भांडवलदार आले तर अनुदानित वीज बंद होईल. आदिवासी दुर्गम भागातील ग्राहकांना वीज मिळणार नाही. भांडवलदार नफ्याचे क्षेत्र ताब्यात घेतील. तोट्यात असलेले क्षेत्र महावितरणकडे राहील. त्यामुळे महावितरणचा तोटा वाढत जाईल. त्यामुळे हे आंदोलन हाती घेण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीकडून सांगण्यात आले. सरकारने यानंतरही वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचे धोरण थांबविले नाही तर १८ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे. दरम्यान, या संपाबाबतचा एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तो पुढीलप्रमाणे 

संपकऱ्यांवर कारवाईचा बडगामहावितरणने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. तर रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.

अशी घेणार खबरदारी- वीज पुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयांच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.- हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहेत.- एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त अभियंते व कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा विभागातील अभियंत्यांना संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे.

...तर एजन्सीदेखील बडतर्फमहावितरणतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या ज्या एजन्सी संपकाळात काम करणार नाहीत, त्यांना बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्रPower Shutdownभारनियमन