शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बदलणार की सरकारमध्ये बदल?; चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर नाना पटोलेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:08 IST

राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती.

मुंबई : राज्यातील सरकार १० मार्चला बदलणार, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. 

राज्यात सत्ता बदलाचे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही केले होते, पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती. १० मार्चला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याला जोडून पाटील यांच्या विधानाकडे बघितले जात आहे. पटोले यांनी बुधवारी भंडारा येथे पत्रकारांशी बोलताना, सरकारमध्ये जे चालले आहे त्यालाही दुरुस्त करण्याची वेळ आली आहे, असे सूचक विधान केले.

सरकारमध्ये काँग्रेसचे १२ मंत्री आहेत. सध्या पाच राज्यांची निवडणूक सुरू आहे. माझे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले आहे. १० मार्चपर्यंत संधी द्या. आपल्या सरकारमध्ये जे काही चालले आहे, ते दुरुस्त करण्याची वेळ आपल्या हाती आहे, असे पटोले म्हणाले. पटोले यांच्या या विधानामुळे आता काँग्रेसमध्ये काही मंत्र्यांना डच्चू मिळून काहींना नव्याने संधी मिळणार का, मंत्र्यांपैकीच कोणाला विधानसभा अध्यक्षपदाची संधी मिळणार का? अशी चर्चासुरू झाली आहे. स्वत: पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदासोबतच मंत्री होण्यासही इच्छुक असल्याचे म्हटले जाते. 

सरकार पाडण्याचे भाजपचे दावे फुसके आहेत. महाविकास आघाडी एकसंध असून सरकार मजबूत आहे. भाजपच्या दबावतंत्रामुळे हे सरकार कधीही पडणार नाही. भाजपच्या, केंद्राच्या दडपशाहीचा आम्ही एकजुटीने प्रतिकार करू. त्यांना कितीही तारखा देऊ देत सरकार मजबूत आहे. - नाना पटोेले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेस