शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 10:17 IST

मुख्यमंत्रिपदावरून निर्मण झालेल्या वादानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध जवळपास संपुष्टात आले आहेत.

मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून निर्मण झालेल्या वादानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध जवळपास संपुष्टात आले आहेत. अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनाभाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडल्यात जमा आहे. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक रविवारी संध्याकाळी बोलावण्यात आली आहे. मात्र राज्यात सत्तास्थापनेवरून झालेल्या वादानंतर शिवसेना भाजपापासून दुरावली असून, त्यामुळेच एनडीच्या या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेशी असलेले संबंध बिघडल्यानंतर शिवसेनेला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना आणि एनडीए यांच्यातील संबंध सध्यातरी संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे.  दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर  भाजपाचेच सरकार राज्यात येणार असून मुख्यमंत्रीदेखील भाजपचाच असेल असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत हीच भूमिका मांडल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत पाटील म्हणाले की, राज्यात क्रमांक एकचा पक्ष भाजपच आहे. भाजपचे १०५ आमदार निवडून आले आहेत. मित्रपक्ष तसेच अपक्ष आमदार ज्यांनी भाजपला समर्थन दिले आहेत असे १४ धरून भाजपचे संख्याबळ ११९ होते.त्यामुळे भाजपला वगळता राज्यात सरकार स्थापनच होऊ शकत नाही.भाजपच्या दादर येथील कार्यालयात तीन दिवसीय चिंतन बैठक सुरू आहे. आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांना माहिती देताना पाटील म्हणाले की, भाजप ५९ जागांवर पराभूत झाला.त्यापैकी ५५ जागांवर भाजपाच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत.आम्ही इतर पक्षातून आलेल्या २६ जणांना उमेदवारी दिली.त्यापैकी १६ जण विजयी झाले आहेत. १९९० नंतर कोणत्याच पक्षाला १०० जागांवर विजय मिळालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मिळूनही १०० आमदार यावेळी आलेले नाहीत. त्यामुळे सर्वच आघाडयांवर विचार करता भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहाPoliticsराजकारण