आजारी उद्योगांसाठी योजना राबविणार
By Admin | Updated: August 5, 2016 05:27 IST2016-08-05T05:27:59+5:302016-08-05T05:27:59+5:30
राज्यातील उद्योगांसाठी जास्तीतजास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग धोरण जाहीर करण्यात आले आहे.

आजारी उद्योगांसाठी योजना राबविणार
मुंबई : राज्यातील उद्योगांसाठी जास्तीतजास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणानुसार आजारी उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी योजना राबविली जाणार असून, लघुउद्योगांसाठी भांडवल देण्याची तयारी आहे. तसेच लवकरच महिलांसाठी उद्योग धोरण जाहीर करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
आर्थिक मंदीमुळे उद्योजकांमध्ये उदासीन वातावरण असल्याबद्दल प्रभाकर घार्गे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मागास भागात जास्तीतजास्त उद्योग यावेत आणि रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून उद्योगांना वीजसवलत लागू करण्यात आली आहे. समितीने शिफारशी केल्यानुसार विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना वीज सवलत दर योजना लागू करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही जमीन संपादित केली जाणार नाही, असे देसाई यांनी पुन्हा स्पष्ट केले. बागायतदार शेतकऱ्यांनी जमिनी संपादनास विरोध केल्यास त्यांच्या जमिनी परत केल्या जातील. एकआयडीसीसाठी नांदेड, चाकण, मावळ व अन्य ठिकाणच्या बागायत जमिनी परत करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.
राज्यात १० टेक्सटाईल पार्क उभारले जाणार आहेत. अमरावतीमधील नांदगाव पेठ, यवतमाळ, मराठवाड्यातील
हिंगोली, परभणी, नांदेड अशा ठिकाणी टेक्सटाईल पार्क उभारले जातील, असे देसाई यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
>राज्यात १० टेक्सटाईल पार्क उभारणार
अमरावती, यवतमाळ, मराठवाड्यात हिंगोली, परभणी, नांदेड अशा ठिकाणी टेक्सटाईल पार्क उभारले जातील, असे देसाई यांनी सांगितले. समितीने शिफारशी केल्यानुसार विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम उद्योगांना वीज सवलत दर योजना लागू करण्यात आली आहे.