त्या कंपन्यांचे परवाने रद्द करणार -फुंडकर

By Admin | Updated: July 23, 2016 05:03 IST2016-07-23T05:03:56+5:302016-07-23T05:03:56+5:30

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप आणि रब्बी हंगामात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा सहा कंपन्यांनी केल्याचे समोर आले

Will revoke those companies's licenses- Phundkar | त्या कंपन्यांचे परवाने रद्द करणार -फुंडकर

त्या कंपन्यांचे परवाने रद्द करणार -फुंडकर


सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप आणि रब्बी हंगामात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा सहा कंपन्यांनी केल्याचे समोर आले असून त्यांचा परवाना राज्याच्या कृषी आयुक्तांच्या आदेशाने रद्द करण्यात येईल, असे आश्वासन कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिले. दीपक चव्हाण आदी सदस्यांनी या बाबतचा प्रश्न विचारला होता. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी कंपन्यांवर कारवाईची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सत्यजित पाटील आदींनी अशा कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.

Web Title: Will revoke those companies's licenses- Phundkar