शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

परराज्यातील खासगी विद्यापीठे राज्यात येणार? केंद्र सुरू करण्यास ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 13:16 IST

‘यूजीसी (खासगी विद्यापीठांमध्ये मानकांची स्थापना आणि देखभाल) नियमावली, २००३’नुसार ही परवानगी देण्याचा निर्णय यूजीसीने १३ फेब्रुवारीला  झालेल्या आपल्या ५७७व्या बैठकीत घेतला.

मुंबई : देशातील खासगी विद्यापीठांना आता लवकरच परराज्यात केंद्र (ऑफ कॅम्पस) सुरू करून आपले कार्यक्षेत्र विस्तारता येणार आहे. मात्र याकरिता ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ची (यूजीसी) मान्यता आणि संबंधित राज्याची ना हरकत विद्यापीठांना घ्यावी लागणार आहे.

‘यूजीसी (खासगी विद्यापीठांमध्ये मानकांची स्थापना आणि देखभाल) नियमावली, २००३’नुसार ही परवानगी देण्याचा निर्णय यूजीसीने १३ फेब्रुवारीला  झालेल्या आपल्या ५७७व्या बैठकीत घेतला. त्या संबंधातील अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यापीठांना त्याच ट्रस्ट किंवा कंपनीअंतर्गत चालवले जाणारे कोणतेही संलग्नित महाविद्यालय ताब्यात घेऊन ऑफ-कॅम्पस केंद्र स्थापन करता येऊ शकते. अर्जासोबत संलग्न विद्यापीठाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. खासगी विद्यापीठाने यूजीसीला सादर केलेले तपशील, विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर केले जातील. ऑफ-कॅम्पस सेंटरच्या स्थापनेसाठी १० लाख रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जाईल.

तपासणीनंतरच मान्यताविद्यापीठाने दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी किंवा कुणाची तक्रार आल्यास ऑफ-कॅम्पस सेंटरची तपासणी आयोग करू शकतो. यात नियम आणि निकषांचे गंभीर उल्लंघन आढळल्यास केंद्र बंद करण्यात येईल. या पद्धतीने केंद्र बंद झाल्यास ऑफ-कॅम्पस सेंटरमधील विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठाला मुख्य कॅम्पसमध्ये स्थलांतरित करावे लागेल. यासाठीचे हमीपत्र घेतले जाणार आहे.

या अटींची पूर्तता आवश्यक- मूळ शैक्षणिक संकुल, अभ्यासक्रम सुरू करून किमान पाच वर्षे झालेल्या खासगी विद्यापीठांना मुभा- संबंधित राज्यात बाहेरील खासगी विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याबाबतची कायदेशीर तरतूद असायला हवी.- खासगी विद्यापीठाने यूजीसीच्या अभ्यासक्रम, विद्याशाखा, पायाभूत सुविधा, आर्थिक व्यवहार्यता इत्यादी निकषांची पूर्तता करणे आवश्यक- इतर राज्यातील संबंधित नियामक संस्थेकडून इरादा पत्राची मान्यता घेणे आवश्यक- प्रस्तावित ऑफ-कॅम्पस सेंटरमधील पायाभूत सुविधा, प्राध्यापक आणि इतर सुविधा संबंधित निकष पूर्ण करणे आवश्यक.- केंद्राच्या स्थापनेसाठी विद्यापीठाकडे जमिनीचे मालकी हक्क किंवा किमान ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्टीवर असणे बंधनकारक 

टॅग्स :universityविद्यापीठEducationशिक्षण