शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठीची सक्ती करणार नाही - शिक्षणमंत्री विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 02:00 IST

राज्यातील शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेता येणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेता येणार नाही, असे शिक्षणमंत्रीविनोद तावडे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मराठी सक्ती करणार नसल्याचे सांगत शिक्षणमंत्र्यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वत:च दिलेल्या आश्वासनापासून घूमजाव केले आहे.शिवसेना सदस्य विलास पोतनीस यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे लेखी उत्तर तावडे यांनी दिले. विचाराधीन प्रस्तावाबाबत अधिक माहिती विचारली असता, मराठी अनिवार्य करणार नसल्याचे तावडे म्हणाले.मराठी अनिवार्य करणार नसल्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या भूमिकेवर विलास पोतनीस यांनी आश्चर्य व्यक्त केले. अनेक राज्यांनी आपापल्या राज्यातील भाषांची सक्ती केली आहे. अगदी अलीकडेच गुजरातने सर्व शाळांमध्ये गुजराती भाषेची सक्ती केली आहे. त्यामुळे मराठीत असा निर्णय घेण्यात कसली अडचण आहे, असा प्रश्नही पोतनीस यांनी विचारला आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ इत्यादी राज्यात दहावीपर्यंत स्थानिक भाषा अनिवार्य आहेत, असेही ते म्हणाले.गत अधिवेशनादरम्यान तावडे यांनी सर्व अमराठी शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद न झाल्याने सदस्यांना इंग्रजी भाषण ऐकावे लागले होते. मराठी दिनाचे औचित्य साधून दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय एकमुखाने घेऊनच टाका, असा आग्रह विरोधकांनी धरला होता. त्याला भाजपा-शिवसेना सदस्यांनी पाठिंबा दिला होता. सभागृहाच्या भावना अभ्यास मंडळास कळवून त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येईल, असे तावडे म्हणाले होते.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेEducationशिक्षण