विधानसभा लढविणार नाही : मधुकर पिचड
By Admin | Updated: August 17, 2014 01:45 IST2014-08-17T01:45:58+5:302014-08-17T01:45:58+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव पिचड असतील, असे स्पष्ट करत आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी निवडणुकीला सामोरे न जाण्याचे शनिवारी जाहीर केले.

विधानसभा लढविणार नाही : मधुकर पिचड
>राजूर (जि.अहमदनगर) : आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव पिचड असतील, असे स्पष्ट करत आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी निवडणुकीला सामोरे न जाण्याचे शनिवारी जाहीर केले. पिचड यांनी निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना ही माहिती दिली. पिचड म्हणाले की, आदिवासी समाजाने मला मोठे केले. मला सन्मान मिळवून दिला. देशभरातील या समाजाचे आपण देणो लागतो. त्यादृष्टीने काम करत आलो. भविष्यातही या समाजासाठी मोठे काम करावयाचे असल्यामुळे मला मोकळीक हवी यासाठी आपण निवडणूक लढविणार नसून यावेळी वैभवच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)