शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे बाजी मारणार?; "राज ठाकरेंचा डाव खरा ठरणार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 14:35 IST

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

खेड - MNS Vaibhav Khedekar on BJP ( Marathi News )  विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत मनसेनं अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर याठिकाणी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनीही तयारी सुरू केली आहे. भाजपाकडून अद्याप या मतदारसंघात उमेदवार घोषित केलेला नाही. परंतु भाजपानं दोस्ती निभवावी. जर दोस्ती दिर्घकाळ टिकवायची असेल तर हातात हात घालून पुढे गेले पाहिजे असं विधान मनसेचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांनी म्हटलं आहे. 

वैभव खेडेकर म्हणाले की, राज ठाकरे निर्मळ मनाचे आणि स्वच्छ मार्गाने जाणारे आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला. कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपानेही निरंजन डावखरेंच्या माध्यमातून तयारी सुरू केलीय. परंतु अधिकृत घोषणा अजून त्यांनी केली नाही. राज ठाकरेंचा आदेश मानून आम्ही अभिजीत पानसे यांचं काम सुरु केलं आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच या पदवीधर मतदारसंघात बदल हवाय. माझ्यासारखे पदवीधर मतदार आहेत. त्यांच्या समस्या विधान परिषदेत मांडण्यासाठी अभिजीत पानसे यांच्यासारखा शिक्षणात गाढा अभ्यास असलेला सक्षम उमेदवार पक्षाने दिला आहे. या जिल्ह्यात बदलाचे वारे वाहतायेत. अभिजीत पानसे चांगल्या मताधिक्यांनी निवडून येतील.  मनसे हा स्वतंत्र पक्ष आणि चिन्ह आहे. या शहरात नगरपालिका मनसेकडे आहे. एक आमदार आहे. या मतदारसंघावर परिणाम करणारा मनसेचा उमेदवार आहे. राज ठाकरेंनी टाकलेला हा डाव खरा ठरणार आहे असा विश्वास मनसे नेते वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, १२ तारखेपर्यंत या मतदारसंघात अनेक घडामोडी घडतील. बरेच पाणी पूलाखाली वाहून जाईल. भाजपाने जसं आम्हाला शुभेच्छा दिल्या तसं आम्हीही त्यांना शुभेच्छा देतो. गेल्या निवडणुकीत आम्ही त्यांना मदत केली होती. आता त्यांची जबाबदारी आहे त्यांनी आम्हाला मदत करावी. दोस्ती निभवावी, जर दोस्ती दिर्घकाळ टिकवायची असेल तर हातात हात घालून पुढे गेले पाहिजे. राज ठाकरेंचा आदेश मानून आम्ही मतदारसंघात कामाला लागलो आहे असंही वैभव खेडेकर यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाNiranjan Davkhareनिरंजन डावखरेVaibhav Khedekarवैभव खेडेकरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकRaj Thackerayराज ठाकरे