नवाब मलिकांविरोधात तक्रार करणार - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 05:20 IST2022-01-19T05:19:41+5:302022-01-19T05:20:58+5:30

फडणवीस यांच्या जिवाला काही बरे-वाईट झाले तर त्याची सूत्रे मलिक यांच्याकडे असतील. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांच्याविरोधात सावधगिरीची तक्रार दाखल करायला हवी, असे पाटील म्हणाले.

will lodge a complaint against nawab Malik says bjp leader Chandrakant Patil | नवाब मलिकांविरोधात तक्रार करणार - चंद्रकांत पाटील

नवाब मलिकांविरोधात तक्रार करणार - चंद्रकांत पाटील

मुंबई :  नाना पटोले मारण्याची भाषा करतात, नवाब मलिकदेवेंद्र फडणवीस यांना काशीचा घाट दाखविणार म्हणतात. महाविकास आघाडीवाले बंदुका घेऊन फिरत आहेत का, असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. आहे. तसेच, भाजपच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही केले. 

नवाब मलिक यांनी सोमवारी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात विधान केले होते. शरद पवारांवर बोलणाऱ्या फडणवीस यांना यापूर्वी पवारांनी कात्रजचा घाट दाखविला होता आणि आताही बोलत राहिले तर पवार काशीचा घाट दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला यांनी लगावला होता. यावर आज चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले. फडणवीस यांच्या जिवाला काही बरे-वाईट झाले तर त्याची सूत्रे मलिक यांच्याकडे असतील. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मलिक यांच्याविरोधात सावधगिरीची तक्रार दाखल करायला हवी, असे पाटील म्हणाले.

पाटील यांचे विधान बालिश
चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जरूर तक्रारी दाखल कराव्यात. परंतु, त्यांना राजकीय विधाने कळत नसतील, मराठी भाषाही कळत नसेल तर ते दुर्दैवी आहे. पाटील यांच्या विधानावरून ही बाबच समोर येत आहे, अशा शब्दात मलिक यांनी उत्तर दिले.

Web Title: will lodge a complaint against nawab Malik says bjp leader Chandrakant Patil