शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लोकसभा निवडणुकीत कमळ चिन्हावर लढणार का?; महादेव जानकरांनी दिलं उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 14:32 IST

महायुतीकडून महादेव जानकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा सोडण्यात आली आहे. मात्र ती जागा नेमकी कोणती असणार, याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.

Mahadev Jankar ( Marathi News ) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी काल महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीसोबतच कायम राहण्याचा निर्णय जाहीर केला. नाराज असलेल्या जानकर यांनी मागील काही दिवसांत अनेकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. तसंच शरद पवार यांनी मला माढा लोकसभा मतदारसंघाबाबत आश्वासन दिलं असल्याचं सांगत त्यांनी पवारांचे आभार मानले होते. त्यामुळे जानकर हे लवकरच महाविकास आघाडीत सामील होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र जानकर यांनी यू-टर्न घेत महायुतीसोबत असल्याचे काल जाहीर केले. महायुतीकडून महादेव जानकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा सोडण्यात आली आहे. मात्र ती जागा नेमकी कोणती असणार, याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जानकर नक्की कुठून लढणार, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात असून ते बारामतीतून कमळ चिन्हावरही लढू शकतात, असंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर जानकर यांनी चिन्हाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.

तुम्ही कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार का, असा प्रश्न महादेव जानकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना जानकर म्हणाले की, "माझा एक आमदार आहे, तो रासपच्या चिन्हावर आहे. मी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली होती, तीही माझ्याच चिन्हावर लढवली होती. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूकही मी रासपच्याच चिन्हावर लढणार," असा खुलासा जानकर यांनी केला आहे.

दरम्यान, महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा माढा, परभणी आणि बारामती या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी सुरू आहे. त्यामुळे ते नक्की कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कसा झाला जानकरांचा महायुतीत समावेश?

महादेव जानकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी काल एक संयुक्त निवेदन जारी केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असं महादेव बैठकीत सांगितलं. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितलं आहे," असं महायुतीच्या या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. या निवदेनाच्या खाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महादेव जानकर यांचीही सही आहे.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४baramati-pcबारामती