शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंचे 'ते' स्वप्नही पूर्ण करू; दीपक केसरकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 13:15 IST

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमानोड्डान मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

कुडाळ : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमानोड्डान मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचे नाव न घेताच 'आम्ही नुसती उद्घाटने करत नाही तर काम करतो', असा टोला लगावला आहे. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित होते. सिंधुदुर्ग चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महादेव जानकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राउत उपस्थित होते. 

यावेळी नारायण राणे यांनी नाणार प्रकल्प रद् केल्याबद्दल मुख्यमंत्र्याचे आभार मानले. तसेच कोकणचे कोकणपण टीकू दे; कोकणात प्रदूषणकरी प्रकल्प नको, अशी मागणीही केली. यानंतर दीपक केसरकर यांनी आम्ही नुसती उद्घाटने करत नाही, तर काम करतो. जिल्हयात मोठ्या प्रमाणात निधी आण्यात मुख्यमंत्र्याचा वाटा असल्याचे सांगितले. तसेच सी वर्ल्ड प्रकल्प पुढील दीड वर्षांत पूर्ण करून राणेंचेही स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. 

राज्याचे मंत्री महादेव जानकर यांनी पुढील दोन वर्षांत भारतात मत्स्य विभाग तीन नंबरला आणणार असल्याची घोषणा केली. खेकडा नर्सरी प्रकल्प पहिला असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी कालच शिवसेना भाजपवर चिपी विमानतळावरून टीका केली होती. चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन होत नाही, तर फक्त इमारतीचे उद्घाटन होत आहे. चिपी येथे विमान केव्हा उडेल याचा कोणताही थांगपत्ता नाही, अशी खिल्लीही उडविली होती. तसेच शिवसेना-भाजप मिळून जनतेची फवणूकही करत असल्याचा आरोप केला होता. 

विमानतळाची अजून बरीच कामे बाकी आहेत. उद्या फक्त टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होत आहे. माझ्या कारकीर्दीत विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली होती. प्रत्यक्ष विमान कधी उडणार, अजून कसली कसली उद्घाटने करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Dipak Kesarkarदीपक केसरकरChipi airportचिपी विमानतळ