शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

उद्योग टास्क फोर्स तयार करणार; मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या उद्योग क्षेत्राच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 05:19 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी, असे आवाहन त्यांनी उद्योगांना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात आरोग्यविषयक टास्क फोर्सच्या धर्तीवर उद्योग विश्वासाठी एक टास्क फोर्स तातडीने उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बोलाविलेल्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी फिक्की, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला. संकटाच्या काळात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही उद्योग जगताने मुख्यमंत्र्यांना दिली.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी, असे आवाहन त्यांनी उद्योगांना केले. उद्योग टास्क फोर्सच्या माध्यमातून कोरोना काळात उद्योगांना येणाऱ्या अडचणी सोडविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.बैठकीत राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे, असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगितले. याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढविणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरू करतील, असेही सांगण्यात आले.या बैठकीत उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी. त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्विन यार्दी, एस. एन सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशिष अग्रवाल आदी उद्योगपती सहभागी होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील आपल्या सूचना केल्या.

उद्योगांनी शिवभोजन थाळीसारखे उपक्रम करावेतराज्य शासन मोफत शिवभोजन थाळी देत आहे. उद्योगांनीही आपल्या परिसरात किंवा जवळच्या गावांमध्ये अशा पद्धतीने भोजन द्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगांनी जास्तीत-जास्त ऑक्सिजन निर्मिती करावी, असे आवाहन सरकारतर्फे बैठकीत करण्यात आले. जेएसडब्ल्यू, महिंद्र, गोदरेज, बजाज, रिलायन्स, टाटा, ब्ल्यूस्टार, एल ॲण्ड टी, इन्फोसिस, कायनेटिक इंजिनिअरिंग यांच्या प्रतिनिधींनी, विशेषत: ऑक्सिजन उपलब्धता करून देण्यात येईल तसेच त्यांच्या उद्योगांच्या परिसरात चाचणी केंद्रे उभारणे, लसीकरण मोहीम असे उपक्रम राबविण्याचेही त्यांनी मान्य केले.

मुख्य सचिव सीताराम कुंटे, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव सौरव विजय, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन आदी उपस्थित होते.

कोरोना सुसंगत अशी कार्यप्रणाली तयार कराकोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये, म्हणून उद्योगांनी आतापासूनच कोरोना सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करावे. तशा सुविधा उभाराव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस