शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यान लढा देणार - छगन भुजबळ

By admin | Updated: June 16, 2015 18:00 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालय व घरांवर छापे मारल्यानंतर अडचणीत सापडलेल्या छगन भुजबळ यांनी आपण कोणतीही चूक केली नसून कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. १६ - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालय व घरांवर छापे मारल्यानंतर अडचणीत सापडलेल्या छगन भुजबळ यांनी  आपण कोणतीही चूक केली नसून कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे  स्पष्ट केले. ' मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नसून मी कोणालाही घाबरत नाही' असेही त्यांनी म्हटले आहे. कोणताही निर्णय आपण एकट्याने घेतला नसून कोणताही गैरप्रकार केला नसल्याचे सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज भुजबळ यांच्या एमईटी या संस्थेच्या नाशिक व मुंबईतील कार्यालयांवर तसेच त्यांच्या घरांवर आज सकाळी छापे टाकले.  महाराष्ट्र सदनच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता, या प्रकरणी एकूण १७ जणांवर छापे टाकण्यात आले होते त्याच मालिकेत आता भुजबळ यांची भर पडली.
मात्र ' आपण कोणातीही चूक केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुणालाही एक इंचाची जागा गैर मार्गाने दिली नसून प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणेपुढे नियमांनुसारच काम केले आहे. अनेकदा अनेक खात्यातील वरीष्ठ अधिका-यांनी त्यात बदल सुचवले व काहीवेळा काही प्रस्ताव नामंजूरही केले होते. मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही' असे त्यांनी यावेळी सांगितले. 
ही घरं फक्त माझी एकट्याची नसून ती माझ्या नातलगांची आहेत असे त्यांनी सांगितले. पक्ष आपल्या पाठीशी असून आपण या प्रकरणी कायदेशीर लढा देणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 
भुजबळ यांच्यावर मर्जीच्या कंपन्यांना कामे देणे, सरकारची दिशाभूल, खोटे हिशेब व कंत्राट देण्यासाठी पैसे घेणे या प्रकारचे अनेक आरोप भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहेत.