शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार की नाही? प्रफुल पटेलांचं दिल्लीत मोठं विधान, पहिल्यांदाच मांडली भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:46 IST

Praful patel on ncp merger: अजित पवारांच्या मृत्युनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करण्याचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. त्यावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट भूमिका मांडली. 

Praful patel on ncp merger rumors maharashtra: अजित पवारांचे निधन झाले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्यासाठी चर्चा झाली होती. अजित पवारांची तशी इच्छा होती. विलिनीकरणाचा निर्णय झाला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी असे काही झालेले नाही अशी भूमिका मांडली. याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी विलिनीकरण होणार की नाही, यावर स्पष्ट मत मांडले. 

दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर प्रफुल पटेल म्हणाले, "आमचा पक्ष आहे की नाही? पुढे काय करायचे तो विषय नंतरचा. आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष जसा आहे, त्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही करायची की इतरांनी करायची? आमचे निर्णय घेत असताना, मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे. त्याची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही? अजित पवारांनंतर कोण? हे करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून मी समोर दिसतो. म्हणून मला समोर राहावं लागते. सुनील तटकरे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना समोर राहावं लागते", असे भाष्य त्यांनी केले.  

मी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण, या प्रश्नावर प्रफुल पटेल म्हणाले, "ही प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी अजित पवारांनंतर जी लोक पदांवर आहेत, त्यांच्यावर आहे. म्हणून मी काम करत असताना माझी प्राथमिक जबाबदारी आहे की, आमच्या विधिमंडळ गटनेता आणि उपमुख्यमंत्री कोण असेल, त्याचे पद भरायचे. ते झाले. आता राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा जो विषय आहे, त्याच्यासाठी पक्षाची बैठक बोलवावी लागते. त्यामध्ये आम्हाला विधिमंडळ बैठक बोलवावी लागते. आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा, जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे. मी प्रफुल पटेल अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नाही." 

"आम्हाला आमच्या पद्धतीने करू द्या ना. सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या कुटुंबाबद्दल आम्हाला सन्मान आणि आदर आहे. कोणालाही शंका, परंतु करण्याचे कारण राहणार नाही", असेही पटेल यावेळी म्हणाले.  

विलिनीकरण होणार की नाही? पटेल म्हणाले...

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पुन्हा प्रफुल पटेल यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "मी आज जो माझा पक्ष आहे, त्याबद्दलच बोलणार. काल्पनिक कुठल्याही गोष्टी करणार नाही", असे सांगत प्रफुल पटेल यांनी विलिनीकरण होणार नाही असेच अप्रत्यक्षपणे सांगितले.

"मी एवढंच सांगू इच्छितो की, मी त्यांच्यासोबतचा पदाचा विचार करता सर्वात ज्येष्ठ सहकारी होतो, हे तर मान्य करावं लागेल. माझी भूमिका अजित पवारांच्या सुसंगतच राहिली आहे. २०२३ मध्ये जो निर्णय केला, तेव्हा अजित पवारांसोबत राहिलो. सुनील तटकरे, भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि सगळे ज्येष्ठ नेते, आमदार राहिले. त्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी चालली होती. आमच्यामध्ये जी काही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, ती आमच्या पक्षापुरतीच मर्यादित राहणार आहे. आम्ही ज्या काही गोष्टी आहे, माझ्या मते त्यावर आता चर्चा करणे योग्य नाही", असे पटेल विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Praful Patel clarifies NCP merger stance in Delhi, ends speculation.

Web Summary : Praful Patel addressed NCP merger rumors, emphasizing the party's autonomy in decision-making. He affirmed his role as working president and clarified that he is not in the race for the national president post. Patel indirectly indicated no merger.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारPraful Patelप्रफुल्ल पटेलPoliticsराजकारण