शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप मित्र पक्षांना २२ वरच गुंडाळणार? मित्रांचे फिफ्टी-फिफ्टी की शिंदेंच्या पक्षाला झुकते माप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 11:01 IST

Mahayuti Seat Shearing: भाजप आणि शिवसेनेची २०१९ मध्ये लोकसभेला युती होती तेव्हा शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजप आपल्या दोन मित्र पक्षांना मिळून २२ जागा देणार आहे.

मुंबई  - भाजप आणि शिवसेनेची २०१९ मध्ये लोकसभेला युती होती तेव्हा शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजप आपल्या दोन मित्र पक्षांना मिळून २२ जागा देणार आहे. आपलीच खरी शिवसेना असा दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपलीच राष्ट्रवादी खरी असा दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यामुळे नुकसान होणार असल्याचे आकडेवारी सांगते. 

फडणवीस यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा जागावाटपाचा महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानुसार भाजप २६ जागा लढेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून २२ जागा लढवतील.  याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला २०१९ मधील अविभाजित शिवसेनेइतक्या जागा लढायला मिळणार नाहीत. अविभाजित राष्ट्रवादीने काँग्रेससोबतच्या आघाडीत १९ जागा लढविल्या होत्या आणि चार  जिंकल्या होत्या. 

फॉर्म्युला ठरलेला नाही : फडणवीस  - उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी रात्री पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जागा वाटपाचा महायुतीत फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. गेल्या वेळी ज्या पक्षाने ज्या जागा लढवल्या होत्या त्या त्यांच्याकडे राहतील पण बदल करायचे असल्यास चर्चा होईल.

मविआतही तोच फॉर्म्युला?  - महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडूनही अशाच फॉर्म्युल्याचा आग्रह धरला जाऊ शकतो. ठाकरे गटाकडे पाच खासदार आहेत, तर राष्ट्रवादीतही फूट पडलेली आहे. त्यामुळे त्याआधारे जागावाटप व्हावे, अशी भूमिका काॅंग्रेस मांडू शकते.

कसे असेल जागावाटपाचे गणित?शिंदेंसोबत लोकसभेचे १३ खासदार आहेत, सर्व १३ खासदारांना तिकिटे मिळणार की दोनतीन जागा बदलून दिल्या जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  १३ जागा शिंदे गटाला दिल्या तर उर्वरित ९ जागा अजित पवारांच्या वाट्याला जातील.  अजित पवार यांच्यासोबत आज फक्त सुनील तटकरे (रायगड) हे एकमेव लोकसभा सदस्य आहेत. जाणकारांच्या मते, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या २२ जागांपैकी फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला वापरून प्रत्येकी ११ जागा द्याव्यात अशी भूमिका राष्ट्रवादीकडून घेतली जाऊ शकते. शिंदेंच्या शिवसेनेचा त्यास विरोध असेल. याचवेळी विधानसभेसाठीचेही जागावाटप करण्याचा आग्रह दोन्ही मित्र पक्षाकडून होऊ शकतो.

२०१९ मध्ये भाजपने २५ जागा लढविल्या होत्या आणि तब्बल २३ जिंकल्या होत्या. यावेळी २६ जागा लढविण्याचा इरादा असून वाढीव  एक जागा जास्त लढून महायुतीमध्ये दोन पक्षांना सोबत घेतले तरी आपण आपल्या जागा कमी होऊ दिलेल्या नाही असा संदेश भाजप नेतृत्व पक्षजनांना देऊ पाहत आहे असे दिसते. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस