शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 15:54 IST

मतभेद असू शकतात. मते मतांतरे असू शकतात. मनभेदही संवादाने सुटतात.

मुंबई - उद्धव ठाकरे नौटंकी करतात. ते काँग्रेस सोडणार नाही. उद्धव ठाकरेंनी सावरकरांच्या अपमानावरून तुम्ही ठाकरेबाणा दाखवा, राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारा. मी आजही अभिनंदन करायला तयार आहे. उद्धव ठाकरेंनी सावरकरांच्या अपमानाचा बदला मविआतून काँग्रेसला हाकलवून घ्या मी जाहीर अभिनंदन करेन. भाजपा विश्वासघातकी लोकांना कधीही आपल्यासोबत घेत नाही असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युतीला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. 

आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मतभेद असू शकतात. मते मतांतरे असू शकतात. मनभेदही संवादाने सुटतात. पण विश्वासघाताला जागा नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांसोबत विश्वासघात केला. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ते भाजपाने प्रत्येक सभेत जाहीर केले होते. तेव्हा तुम्ही आक्षेप का घेतला नाही, हे राज ठाकरेंनीही सांगितले. त्यामुळे विश्वासघातकाला जागा नाही असं त्यांनी म्हटलं. 

दोघांची जोडी, लय भारी एकनाथ शिंदेंसारखा कर्तव्यदक्ष आणि १८ तास काम करणारा व्यक्ती, गरिबीतून वर आलेले, समाजातील शेवटच्या माणसाचं दु:खं जाणणारे आहेत. एकीकडे महाराष्ट्रात प्रशासकीय अनुभव आणि देशात राज्याला नंबर वन नेणारे देवेंद्र फडणवीस दुसरीकडे आपले संपूर्ण आयुष्य जनतेसाठी देणारे एकनाथ शिंदे. या दोघांची जोडी महाराष्ट्राला वेगाने विकासाच्या मार्गावर नेत आहे. पुढील ५ वर्ष या जोडीला मिळाली तर महाराष्ट्र देशात क्रमांक १ चं राज्य होईल. जगात भारताची बलाढ्य शक्ती निर्माण होणार आहे त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल असं कौतुक भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

त्याचसोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेही ताकदीचे नेते आहेत. फडणवीसांचे आयुष्य निष्कलंक आहे. मी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलय. अष्टपैलू कर्तृत्व आहे. दोघेही जोरदार बॅट्समन आहे. त्यामुळे कितीही शक्ती त्यांच्यासमोर आल्या हे दोघे जनतेसमोर मतं मागायला जातील तेव्हा साऱ्यांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही बावनकुळेंनी दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा