शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

अजित दादा अस्तित्वाची परीक्षा पास होणार? पवार विरुद्ध पवार सामना बघायला मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 11:56 IST

महाराष्ट्राच्या सर्वाधिक पॉवरफुल अशा पवार घराण्यातील काका-पुतणे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. काका हे गुरु आणि पुतण्या हा चेला. लोकसभेत  गुरूने चेल्याला सहज मात दिली. 

अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री आहेत. काकांच्या सावलीतून ते बाहेर पडले, महायुतीत गेले आणि पुन्हा उपमुख्यमंत्रीच झाले. यावेळची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी तर आहेच; पण पवार विरुद्ध पवार असा रंजक सामना बघायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वाधिक पॉवरफुल अशा पवार घराण्यातील काका-पुतणे एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. काका हे गुरु आणि पुतण्या हा चेला. लोकसभेत  गुरूने चेल्याला सहज मात दिली. 

महायुतीत अजित पवारांना मिळाल्या केवळ चार जागा आणि जिंकले फक्त एक. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतील प्रतिष्ठेच्या लढाईत नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून मोठ्या मतफरकाने पराभूत झाल्या. आता विधानसभेच्या निमित्ताने काका पुतण्याची पुन्हा परीक्षा घेत आहेत. पूर्वी बरेचसे फटकळ असलेल्या अजित पवार यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये स्वत:त बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या गुलाबी जॅकेटची तर सगळीकडे चर्चा आहे. पूर्वी पत्रकारांकडून कठीण प्रश्न आला की ते चिडून उत्तर द्यायचे किंवा टाळायचे; पण आता ते अडचणीच्या प्रश्नांवरही मिश्कील उत्तरे देतात. 

ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘एलिमिनेशन राऊंड’ असेल. एक-दोन मोठ्या पक्षांचा संकोच होईल असा अंदाज आहे. त्या संकोचलेल्या पक्षांमध्ये आपला पक्ष नसावा, उलट काकांवर मात करत, महायुतीत स्वत:ची उपयोगिता सिद्ध करण्याचाच अजित पवार यांचा प्रयत्न असेल. 

वर्चस्व सिद्ध करण्याचे आव्हान लोकसभेपेक्षाही अजित पवारांना विधानसभेचा पेपर अवघड असेल. कारण, लोकसभेचा निकाल अपघात, अपवाद होता आणि राष्ट्रवादीच्या प्रभावपट्ट्यात वर्चस्व आपलेच आहे हे अजित पवार यांना सिद्ध करायचे आहे.

अजित पवार यांच्या जवळच्या एकेक नेत्यावर शरद पवार जाळे टाकत आहेत. त्या जाळ्यात आतापर्यंत काही जण अडकले असून, आणखी काही अडकण्याच्या मार्गावर आहेत.

पत्नी, मुले यांना सोडून पवार घराण्यातील कोणीही आजच्या घडीला तरी अजित पवार यांच्यासोबत नाही. त्यांच्यासाठी हा अत्यंत कसोटीचा काळ आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभा