नव-याने मांसाहाराची सक्ती केली म्हणून पत्नीची आत्महत्या
By Admin | Updated: April 27, 2016 13:37 IST2016-04-27T13:37:37+5:302016-04-27T13:37:37+5:30
मांसाहार खाण्यासाठी नवरा सतत दबाव टाकत असल्याने कंटाळलेल्या एका २२ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नव-याने मांसाहाराची सक्ती केली म्हणून पत्नीची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २७ - मांसाहार खाण्यासाठी नवरा सतत दबाव टाकत असल्याने कंटाळलेल्या एका २२ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा धीरज लुकाम असे मृत महिलेचे नाव असून, नालसोपा-यातील पाटणकर नगरमधील अमी पार्क अपार्टमेंटमध्ये ती पतीसोबत रहात होती.
पूजा शाकाहारी होती. ती मांसाहार करत नसल्याने तिला सतत नव-याची बोलणी, टोमणे ऐकावे लागत होते असे पोलिसांनी सांगितले. पूजाचा पती धीरज लुकाम (२६) गोरेगावला एका इव्हेंट मॅनजमेंट कंपनीत नोकरी करतो. त्याने पूजाच्या नोकरी करण्यावरही बंदी घातली होती.
धीरजने पूजाचा छळ चालवला होता व तिला मास-मच्छी खाण्यासाठी तो जबरदस्ती करत होता असा आरोप पूजाच्या नातलगांनी केला आहे. सततची नव-याची बोलणी, शेरेबाजी ऐकणे असहय झाल्याने तिने अखेर गळफास घेऊन जीवन संपवले. पोलिसांनी आरोपी पतीला कलम ३०६ अंतर्गत अटक केली आहे. वसई न्यायालयाने त्याला २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.