दारूसाठी पैसे न देणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

By Admin | Updated: May 11, 2017 21:28 IST2017-05-11T21:28:18+5:302017-05-11T21:28:18+5:30

दारूपिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही म्हणून तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारणारा पती विजय साहेबराव पाटील (रा. टाकरखेडा, ता.अमळनेर) यास जन्मठेप

Wife's husband who murdered wife without paying for liquor | दारूसाठी पैसे न देणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

दारूसाठी पैसे न देणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 11 : दारूपिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही म्हणून तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारणारा पती विजय साहेबराव पाटील (रा. टाकरखेडा, ता.अमळनेर) यास जन्मठेप व २० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी आज दिला.
टाकरखेडा येथील विजय साहेबराव पाटील (३६) याने ७ आॅक्टोबर २०१५ रोजी पत्नी कविता हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीने पैसे दिले नाही म्हणून विजय तिच्या अंगावर बसला. पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले .तिला धुळे जिल्हा रुग्णालयात हलविले. आले उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा खटला अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अ‍ॅड. किशोर बागूल यांनी दहा साक्षीदार तपासले.न्या दिनेश कोठलीकर यांनी आरोपीस जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: Wife's husband who murdered wife without paying for liquor