शहरं
Join us  
Trending Stories
1
आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
2
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
3
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
4
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
5
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
6
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
7
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
8
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
9
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
10
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
11
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
12
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
13
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
14
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
15
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
16
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
17
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
18
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
19
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
20
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट

Chandrakant Patil : "राजकारणात कशासाठी राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा"; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 19:35 IST

मध्य प्रदेश सरकारचे अनुकरण करत, राज्यातील ओबीसी समाजालाही त्यांचे राजकीय आरक्षण परत मिळावे, या मागणीला घेऊन भाजपने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. 

राज्यात ओबीसी समाज्याच्या राजकीय आरक्षणावरून जबरदस्त राजकारण सुरू आहे. यातच, मुंबईसह १४ महानगरपालिकांत ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे राजकीय पक्ष तथा ओबीसी समाजातही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता याच मुद्द्यावर, मध्य प्रदेश सरकारचे अनुकरण करत, राज्यातील ओबीसी समाजालाही त्यांचे राजकीय आरक्षण परत मिळावे, या मागणीला घेऊन भाजपने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. 

मोर्चादरम्यान पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तीव्र शब्दात टिका केली. 'मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला होता, पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले, हे आम्हाला सांगितले नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्याचे एका पत्रकारांने चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावर चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत, "कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी आणि स्वयंपाक करा, असे म्हटले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील? -सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, 'कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या," असे पाटील यांनी म्हटले आहे.

यावेळी मोर्चात खासदार प्रितम मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर आणि गिरीश महाज आदी नेते उपस्थित होते. भाजपाच्या मुख्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा पोलिसांनी सुरू होताच आडवला आणि आंदोलकांना ताब्यात घेत, आंदोलन संपल्याचेही जाहीर केले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस