मोबाईलचं बिल भरता मग वीजेचं का नाही ? - एकनाथ खडसेंचा शेतक-यांना सवाल

By Admin | Updated: November 24, 2014 10:25 IST2014-11-24T10:24:38+5:302014-11-24T10:25:43+5:30

शेतक-यांकडे मोबाईलचं बील भरायला पैसे असतात, मग ते वीजेचं बील का भरत नाहीत? असा खोचक सवाल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Why not pay electricity bill? Eknath Khadse's farmer questions | मोबाईलचं बिल भरता मग वीजेचं का नाही ? - एकनाथ खडसेंचा शेतक-यांना सवाल

मोबाईलचं बिल भरता मग वीजेचं का नाही ? - एकनाथ खडसेंचा शेतक-यांना सवाल

>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २४ - शेतक-यांकडे मोबाईलचं बील भरायला पैसे असतात, मग ते वीजेचं बील का भरत नाहीत? असा खोचक सवाल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. यापूर्वी विरोध पक्षनेते असणारे एकनाथ खडसे शेतक-यांना वीज बील माफ करा अशी मागणी करत होते, मात्र आता सत्तेत आल्यावर त्यांचा सूर बदलला असून असे खोचक वक्तव्य करत ते शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहेत. अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा सवाल केला
मोबाईलचं कनेक्शन तुटू नये म्हणून तुम्ही हजार रुपयांचं बील भरता ना मग वीजबील का भरत नाही असा सवाल त्यांनी शेतक-यांना विचारला. त्यामुळे शेतक-यांकड पैसे नाहीत हे आपल्याल पटत नाही, असे सांगत फारतर वीजबिलात सवलत देऊ, पण ते माफ नाही करणार, असेही खडसे पुढे म्हणाले.
सत्तेत येताच खडसेंच्या या बदललेल्या पवित्र्यामुळे त्यांना त्यांच्याच मागण्यांचा विसर पडलाय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Web Title: Why not pay electricity bill? Eknath Khadse's farmer questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.