शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकची मुजोरी! बेळगाव रेल्वे स्थानकात शिवरायांची प्रतिमा लावण्यास विरोध; रोहित पवारांनी केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 14:39 IST

बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर अनेक महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जाणीवपूर्वक लावण्यात आली नाही.

प्रकाश बेळगोजी बेळगाव : नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगावरेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा प्राधान्याने स्थापित केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट द्वारे केली आहे.नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर अनेक महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. परंतु त्यामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा जाणीवपूर्वक लावण्यात आली नाही. तेंव्हा या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनापूर्वी महापुरुषांच्या प्रतिमांमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचा अंतर्भाव केला जावा अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केली आहे. कोंडुसकर यांनी रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचा अंतर्भाव व्हावा या मागणीसाठी काल गुरुवारी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छेडले होते. तसेच रेल्वे स्थानकावर सर्व वीर पुरुषांच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या मात्र जाणीवपूर्वक छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा उभारण्यात आली नाही असा आरोप करून मराठी भाषिकांचा एवढा द्वेष का? एवढी मुजोरी योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. शिवरायांच्या प्रतिमेसंदर्भात रमाकांत कोंडुसकर यांनी छेडलेल्या आंदोलनाची दखल महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे. फक्त दखल घेऊन गप्प न बसता आमदार पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उभारण्यात यावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला डावलले जात असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून द्यावी. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्या मुंबई दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या कानावर शिवरायांच्या अवमानाचा हा प्रकार घालावा, अशी मागणी ही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजbelgaonबेळगावrailwayरेल्वेRohit Pawarरोहित पवार