शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 20:24 IST

एकनाथ शिंदे यांच्यावर अशा पद्धतीने शिवसेना सोडण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे.

 विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघाले आहे. यामुळे शिवसेनेतील नाराजीही आता उघड झाली आहे. यातच, एकनाथ शिंदे यांच्यावर अशा पद्धतीने शिवसेना सोडण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे.

राणे म्हणाले, "अपमानित करणे, तुला मुख्यमंत्री बनवतो, असे दहा वेळा सांगून त्यांना निवडणुकीत, तसेच काही इतर घटनांमध्ये खर्च करायला सांगायचे आणि नंतर आपणच मुख्यमंत्री व्हायचे, फसवणूक करायची, असे अनेक वेळा एकनाथ शिंदेंबद्दल घडले आहे. यातून शेवटी त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि म्हणून त्यांनी हे बंड पुकारले असेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अता महाराष्ट्रात आघाडी सरकार राहिलेले नाही -अता महाराष्ट्रात आघाडी सरकार राहिलेले नाही. अस्तित्वात नाही. ही मराराष्ट्राच्या दृष्टीने चांगली गोष्ट झाली आहे. अडीच वर्षात कोणत्याही स्वरुपाचा विकास नाही. सुडाच्या भावणेतून कारवाया करायच्या, विरोधकांना अपशब्द बोलायचे, मुख्यमंत्री पदाचा जो मान होता, जी शान होती तीही घालवली. त्यामुळे जे होते ते चांगल्यासाठीच होते. असेच म्हणावे लागेल. आता यानंतर महाराष्ट्रात काय घडते ते आपण बघुया, असेही राणे म्हणाले.

राऊत खरे किती बोलणार, खोटेच बोलणार ते - संजय राऊतांबद्दल बोलताना राणे म्हणाले, “संजय राऊत खरे किती बोलणार, खोटेच बोलणार ते. आता आवाज बसलाय, खाली गेलाय. उद्यापर्यंत तो आवाज बंद होईल. ते काहीही बोलतात. काय किडनॅपस ते वावरताना दिसत आहेत आणि शिवसेनेला कोणीही घाबरत नाही,” असंही राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेeknath khadseएकनाथ खडसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत