शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:36 IST

२ सप्टेंबरचा जीआर रद्द करा; मुख्यमंत्र्यांकडे  मागणी; १० ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा काढण्यावर हे नेते ठाम आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विविध प्रवर्गांत मराठा समाज मोठ्या प्रमाणात आरक्षण घेत असून, गेल्या तीन वर्षांत या समाजाच्या कल्याणासाठी २५ हजार  कोटी रुपये राज्य सरकारने दिले. सगळे काही मराठा समाजालाच द्यायचे आहे का?, ओबीसींचे काय करणार?,  असा संतप्त सवाल ओबीसी नेत्यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केला. तसेच, १० ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा काढण्यावर हे नेते ठाम आहेत.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री छगन भुजबळ चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, अतुल सावे, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खा. प्रशांत पडोळे, आ. परिणय फुके, आ. विकास ठाकरे, मुख्य सचिव राजेश कुमार, नवनाथ वाघमारे, प्रकाश शेंडगे, मंगेश ससाणे, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

लग्न, प्रतिज्ञापत्राच्या आधारे दाखले नाहीचमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की मराठवाड्यामध्ये निजामाचे राज्य होते. त्यामुळे तेथील नोंदींवर आधारित हैदराबाद गॅझेट ग्राह्य धरले आहे.जो कुणबी आहे, त्याच्यावर अन्याय होता कामा नये. या शासन निर्णयात कायद्याचे संपूर्ण पालन करण्यात आले असून, केवळ लग्न किंवा प्रतिज्ञापत्राच्या आधारे कुणालाही प्रमाणपत्र मिळेल, ही भीती निराधार आहे. जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे यासाठी कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार केले आहेत. वंशावळ समिती गठीत केली आहे. खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या आधारे कुणालाही प्रमाणपत्र मिळणार नाही.

त्यांना आरक्षण किती? डोक्यावर का घेताय? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने जो जीआर काढला, त्यामुळे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळणार असून, हे ओबीसी आरक्षणावर गंडांतर आहे. त्यांना इतके डोक्यावर का घेतले जात आहे? मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आहे. एसीबीसीमधून देखील ते आरक्षण घेतात, खुल्या प्रवर्गातही फायदा घेतात आणि आता ओबीसीमधूनही फायदा घेतील, तर त्यांना आरक्षण किती टक्के? ओबीसींच्या कल्याणासाठी २५ वर्षांत तीन हजार कोटी रुपये राज्य सरकारने दिले. मराठा समाजाला तीन वर्षांत २५ हजार कोटी रुपये दिले.  स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणात घुसखोरी करावी, केवळ या एकाच उद्देशाने ओबीसीमधून मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण हवे आहे. मंत्री  भुजबळ यांनी खाडाखोड करून दाखले दिले जात असल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Only Maratha Community? OBC Leaders Question, Firm on Protest

Web Summary : OBC leaders question Maratha community benefits, citing disproportionate resource allocation. They criticize Maratha access to multiple reservations and demand fair treatment for OBCs. Leaders remain firm on their planned Nagpur protest.
टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण