शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik : प्रत्येक मुसलमानाचा अंडरवर्ल्ड, दाऊदशी संबंध का जोडला जातो? - निलोफर मलिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 06:31 IST

संपूर्ण प्रकरण बनाव करत वेगळ्या पद्धतीने दाखविण्याचा केंद्रीय यंत्रणांचा प्रयत्न असल्याचा आरोप निलोफर यांनी केला.

मुंबई : केंद्रीय यंत्रणांनी यापूर्वीही खोट्या आरोपांनी आमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. एनसीबीने माझ्या नवऱ्याला अटक केली होती. आता, ईडीने माझ्या वडिलांविरोधात कारवाई केली आहे. पण, याविरोधात आम्ही लढत राहू, असे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांनी गुरुवारी माध्यमांना सांगितले. तसेच, प्रत्येक मुसलमानाचा अंडरवर्ल्ड, दाऊदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न का होतो? असा सवालही त्यांनी केला.

मलिक यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक- खान यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ईडी आणि भाजपवर टीका केली. हे संपूर्ण प्रकरण बनाव करत वेगळ्या पद्धतीने दाखविण्याचा केंद्रीय यंत्रणांचा प्रयत्न असल्याचा आरोप निलोफर यांनी केला.

"आम्ही जमीन घेतली; पण ज्या पद्धतीने यंत्रणा सांगत आहेत, तशी नाही. नवाब मलिकांना समन्स न देताच ईडीचे लोक त्यांना घेऊन गेले. ईडीचे अधिकारी सर्च वॉरंट घेऊन आमच्या घरी आले. ते केंद्राच्या विरोधात लढत होते, त्यामुळे त्यांना अगदी चुकीच्या पद्धतीने नेण्यात आले," असेही त्या म्हणाल्या. "तर असे राजकारण या महाराष्ट्राने कधी बघितले नव्हते. ५५ लाखांच्या व्यवहारासाठी ईडी लागत असेल, तर यापुढे १० रुपये खिशात ठेवताना, १० रुपयाच्या गोळ्या घेतानाही विचार करायला पाहिजे की याचीही ईडी चौकशी होऊ शकते," असा टोलादेखील जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

‘ते महसूलमंत्री कधीही नव्हते’ ईडीने रिमांड कॉपीत मलिक हे राज्याचे महसूल मंत्री होते, असा दावा केला आहे. अशा प्रकारच्या खोट्या आरोपांनीच मलिक परिवाराला लक्ष्य केले जात असल्याचे निलोफर म्हणाल्या. नवाब मलिक पाचवेळा मंत्री होते. पण ते महसूल मंत्री कधीच नव्हते. जो माणूस त्या पदावरच नव्हता, त्याला त्या पदावर दाखवण्याची चूक एवढी मोठी तपास यंत्रणा करते, हे खेदजनक आहे.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMaharashtraमहाराष्ट्र