शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

नववर्षाचे संकल्प का तुटतात? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:41 IST

नवीन वर्षाचे संकल्प करण्यामागची मानसिकता नेमकी काय असते? लोकं का संकल्प करतात? आणि केलेले संकल्प का मोडतात? हा एक संशोधनाचा विषय आहे.

डॉ. मानसी देशमुख, क्लिनिकल सायकाॅलॉजिस्ट -जुनं वर्ष सरताना वेध लागतात नवीन वर्षाचे, नवीन सुरुवात करायचे. मागच्या वर्षी ठरवलेल्या गोष्टींपैकी  काय जमलं नाही, याची यादी करताना आता ही गोष्ट नक्की यावर्षी करूया म्हणत संकल्पांची बकेट लिस्ट वाढते; पण खरंच यातील किती संकल्प पूर्ण होतात?

नवीन वर्षाचे संकल्प करण्यामागची मानसिकता नेमकी काय असते? लोकं का संकल्प करतात? आणि केलेले संकल्प का मोडतात? हा एक संशोधनाचा विषय आहे. यावर मानसशास्त्रज्ञांनी अनेक निष्कर्ष काढले. संकल्प करण्यामागे कित्येकदा स्वतःची स्वप्रतिमा जपणं, सगळे करतात म्हणून काही ठरविणे, सारासार विचार न करता निश्चय करणे या धारणा असू शकतात. एक स्टेट्स जपणं, वरवर दाखविण्यासाठी करणं हा भाग असू शकतो. 

आपल्या क्षमता, उद्दिष्ट, कौशल्य, प्राधान्य यांचा विचार न करता जर अवास्तव मागणीचे संकल्प केले तर ते नऊ दिवसही टिकत नाहीत. ‘नव्याचे क्षोभ दिवस’ ही म्हण प्रचलित आहेच! कित्येक जण एक जानेवारीपासून जिम करायचं, व्यायाम करायचा म्हणून जिमचं सभासदत्व घेतात! अगदी सकाळची बॅच घेतात; पण त्यांना सकाळी लवकर उठणं याआधी कधीच माहिती नसतं. त्यांचं झोपेचं घड्याळ सेट नसतं. मग जिमला दांड्या होतात. यासाठी आपल्याला जे संकल्प साध्य करायचेत त्यासाठी छोटी-छोटी उद्दिष्टे ठेवून त्या मोठ्या संकल्पाची तयारी करावी. संकल्प ठरवताना जर खालील गोष्टी विचारात घेतल्या तर तो पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. अनेक मानसशास्त्रीय संशोधनातून या गोष्टींचा विचार केला गेला आहे.

संकल्प खूप मोठा किंवा आवाक्याबाहेरचा करू नये.स्वच्या बलस्थान व कमतरतांचा विचार करून संकल्प करावेत. म्हणजे जर माझं वजन जास्त आहे तर एकदम एका महिन्यात दहा किलो वजन कमी करण्याचा संकल्प केला तर ही मागणी वास्तवाला धरून नाही. ते हळूहळू कमी करणं श्रेयस्कर असतं. संकल्प पूर्ण करण्यासाठी स्मार्ट गोलस् ठेवावीत. त्याकरता छोटी उद्दिष्टे ठरवून ती पूर्ण करण्यासाठीचा कृती आराखडा तयार करावा.तो आराखडा पूर्ण करणारी कृती होतेय की नाही याची नोंद ठेवावी, मोजमाप करावं.अशा रीतीने छोटी कृती करत करत व ती नोंदवत मोठ्या कृतीपर्यंत पोहोचायचा मानस पूर्ण करावा.

हिमालयात जाऊन ट्रेक करायचा असेल तर ज्याप्रमाणे शारीरिक फिटनेस व स्टॅमिना वाढवण्यासाठी दररोज व्यायाम किंवा टेकडी चढण्याची सवय लावावी लागते. तसंच आपण ठरवलेले संकल्प जर सिद्धीस न्यायचे असतील तर सातत्याने करता येतील असे सोपे संकल्प करून मनाची तयारी करावी.संकल्प पूर्ण करायला प्रेरणा महत्त्वाची आहे. माणूस अंतःप्रेरणेने जर प्रेरित झाला असेल तर बाह्य परिस्थिती किंवा कोणतीही सबब ही त्याच्या संकल्पपूर्तीत आड येत नाही. त्यामुळे अंतःप्रेरणा टिकावी म्हणून मनाची शांतता अबाधित राखणे हे फार महत्त्वाचे आहे. एकाग्रता, समर्पण, शिस्त यांसारखे व्यक्तिमत्त्वातील स्वभावपैलू हे संकल्पाला पूर्ण करण्यास मोलाची मदत करतात. वेळेचं नियोजन हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. कित्येकदा आज वेळ मिळाला नाही, उद्या करू, असं म्हणत चालढकल होते. प्रोक्रास्टीनेशन, म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलायची सवय जडते. त्यामुळे वेळच्या वेळी कामं करणं, जागेवर गोष्टी नीट आवरून ठेवणे या कृती अंगीकाराव्यात. अनावश्यक कृती व विचारात वेळ घालवला नाही तर ठरवलेल्या कामास न्याय देता येतो. वर्तमानात सजगपणे जगायची सवय ही संकल्प पूर्ण करायला पोषक आहे. अतिविचार किंवा चिंता किंवा भूतकाळातील काही नकारात्मक प्रसंग हे मनातून काढून टाकले तर आज, आता व इथे असा क्षणाचा विचार करता येईल. क्षणस्थ होऊन जगता आलं की, कामं भरभर होतात. त्यामुळे योगसाधना, दीर्घ श्वसन, पोषक आहार व पुरेशी झोप अशी जीवनशैली स्वीकारली तर संकल्प पूर्णत्वास जाण्याचं प्रमाण वाढेल. 

टॅग्स :New Yearनववर्ष