शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 13:00 IST

लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकातून महाराष्ट्रातल्या अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आलंय.

RSS Organiser : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवीन सरकार स्थापन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी भाजपच्या अपयशची चर्चा अद्याप सुरु आहे. ४०० पारची घोषणा देणाऱ्या भाजपला केवळ २४० जागा जिंकता आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपची कामगिरी गेल्या वेळेपेक्षा वाईट आहे. भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भाजपला यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी, असे मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. आता संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत एक लेख प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये आता महाराष्ट्रातील भाजपच्या कामगिरीवर भाष्य करण्यात आलंय.

ऑर्गनायझर मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आरसा दाखवला आहे. या लेखात लेखात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण भाष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षप्रवेशामुळे भाजपला धक्का बसल्याचे म्हटलं आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर अजित पवार देखील महायुतीमध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्या बाबत आता राष्ट्राय स्वयंसेवक संघाच्या मासिकामध्ये उल्लेख करण्यात आलाय.

"महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण टाळता येण्याचे तसेच हेराफेरीचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रात जे घडलं ते टाळता आलं असते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. भाजपा आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळालं असतं. शरद पवार दोन-तीन वर्षांत गायब झाले असते कारण चुलत भावांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद संपली असती. हे चुकीचे पाऊल का उचलले गेले? ज्या काँग्रेसी विचारसरणीविरोधात वर्षानुवर्षे लढलो त्यांच्या संघावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याला पायघड्या घालण्यात आल्याने भाजपा समर्थक दुखावले गेले. एका फटक्यात भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली. महाराष्ट्रात नंबर वन होण्यासाठी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, कोणताही संघर्ष न करता तो आणखी एक राजकीय पक्ष बनला," असे ऑर्गनायझरमध्ये म्हटलं आहे.

उमेदवाराची निवड करताना चूक?

"नरेंद्र मोदी सर्व  ५४३ जागांवर लढत आहेत हा समज मर्यादित मूल्याचा ठरला. उमेदवार बदलल्यावर ही कल्पना आत्मघातकी ठरली. पक्षांतर करणाऱ्यांना अधिक महत्त्व दिले गेले. बाहेरुन येणाऱ्यांना सामावून घेण्यासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खासदारांचाही बळी देणे हानिकारक ठरले. असा अंदाज आहे की सुमारे २५ टक्के उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आले होते. त्यामुळे स्थानिक समस्या आणि उमेदवाराचा ट्रॅक रेकॉर्ड महत्त्वाचा असल्याचे दिसून येते. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची उदासीनताही याच कारणामुळे होती," असाही उल्लेख ऑर्गनायझरमध्ये करण्यात आलाय. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे