ठाकरेंचे नेतृत्व सोडून, शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? मनिषा कायंदे स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 12:43 IST2023-06-19T12:43:01+5:302023-06-19T12:43:57+5:30
प्रा. मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सोडून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ठाकरेंचे नेतृत्व सोडून, शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? मनिषा कायंदे स्पष्टच बोलल्या
मुंबई - शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच शिवसेनाउद्धव ठाकरे गटातील नेत्या, विधान परिषद सदस्य मनिषा कायंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) प्रवेशही केला आहे. यानंतर आत्यांना लगेचच शिवसेना सचिव तथा पक्षप्रवक्तेपदही देण्यात आले आहे. मात्र प्रा. मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सोडून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात कायंदे यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत भाष्य केले.
अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडेच -
कायंदे म्हणाल्या, "मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेली दहा वर्ष, काम करत होते. त्यांनी मला विधानसभेचे सदस्यत्वही दिले. पण असे काय घडले? की मी आता मुख्यमंत्री एकनाथन शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. मी २०१२ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला ती बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना होती आणि आताही मी शिवसेनेतच आहे. नेतृत्वात बदल झाला आहे. हे खरे आहे. अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यामुळे मी शिवसेनेतच आहे. पक्षबदल काही केलेला नाही."
शिवसेनेची आणि भाजपची विचारधारा एकच -
दुसरे म्हणजे, "माझा राजकीय प्रवास मोठा आहे. मी भारतीय जना पार्टीतही काम केले आहे. सर्वप्रथम मी एक मतदार म्हणून शिवसेनेलाच मतदान केले आहे. त्यामुळे शिवसेनेची आणि भाजपची विचारधारा एकच होती. त्यामुळे मी भाजपतून शिवसेनेत आले. अर्थात माझी विचारधारा तीच राहिली.
जुन्या जानत्या शिवसैनिकांना महाविकासआघाडी कधीही पसंत नव्हती -
२०१९ मध्ये भाजप शिवसेना एकत्रित लढले आणि नंतर युती तुटली. याला अनेक कारणे आहेत. ती अनेक वेळा स्पष्ट झाली आहेत. महाविकास आघाडीसमोर अनेक समस्या येत गेल्या. यात विचारधारा न पटण्यासारखी होती. मात्र पक्षादेशाचे आम्ही आवडत नसतानाही पालन केले. जुन्या जानत्या शिवसैनिकांना ही महाविकासआघाडी कधीही पसंत नव्हती. पण आपण पक्षात असल्याने पक्षाची जी भूमिका ती आपली भूमिका, असे मानले. पण पाणी डोक्यावरून जायला लागते. मग तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा असो, आपण अत्ताच पाहिलं की, पक्ष बळकटी करणासाठी ज्यांना जांना जवळ केलं. एक प्रवक्ता म्हणून ती गोष्ट डिफेंड करणं कठीन जात होते.
शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारधारा भरकटतेय -
कायंदे म्हणाल्या, मी एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला, कारण मी एक संघटनात्मक काम करणारी कार्यकर्ता आहे. मला संघटनात्मक काम करायची पहिल्यापासूनच इच्छा होती आणि मी ते करत राहिले. भाजपत असताना मी १० वर्ष मुंबई महिला आघाडीची अध्यक्ष होते, प्रदेश उपाध्यक्षही होते. त्यामुळे संघटनात्मक काम करणे हा माझा पिंड आहे. एवढेच नाही, तर एकंदरीतच शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विचारधारा भरकटतेय. ती विचारधार, माझ्या मुळ हिंदुत्वाच्या विचारधारेपासून दिवसेंदिवस दूर जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.