शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात का घ्यावी लागली धाव? संजय राऊत थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 11:12 IST

राऊत म्हणाले, सुनावणी सुरू होईल, पण आज निर्णय येण्याची शक्यता मला वाटत नाही...

शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी फडकावलेल्या बंडाच्या झेंड्यानंतर, राज्यातील राजकारण प्रचंड ढवळून निघत आहे. यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर एकनाथ शिंदे भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री झाले. दरम्यान, शिंदे यांच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी आज (बुधवार, २० जुलै) सुनावणी होणार आहे. यासंदर्भात, पक्षांतर बंदीच्या नियमांचे पालन केले जात नाही. म्हणूनच आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली, असे राऊतांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, सुनावणी सुरू होईल, पण आज निर्णय येण्याची शक्यता मला वाटत नाही. आमचेही लक्ष आहे. आम्हाला वाटते, की सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल आणि लोकशाहीची उघडपणे हत्या कुणी करू शकणार नाही. यासंदर्भात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल याची खात्री आहे. कारण कायदा आणि घटनेची पायमल्ली करून फुटीर गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न होत आहे. पक्षांतर बंदीच्या नियमांचे पालन केले जात नाही. म्हणूनच आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. 

ते ज्यो बायडेन यांचे घरही ताब्यात घेतील -संसदेच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाची फुटीर गट मागणी करत आहे, असे विचारले असता राऊत म्हणाले, फुटीर गट चंद्रावरही कार्यालय स्थापन करेल. त्यांना शिवसेनेचा ताबा हवा आहे. त्यांना सामना हवा आहे, एक दिवस ते ज्यो बायडेन यांचे घरही ताब्यात घेतील. बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ पक्ष आमचाच आहे, बाळासाबेहांनाही आम्हीच पक्षात आणलं, उद्धव ठाकरेंनाही आम्हीच पक्ष प्रमुख केले, असेही ही सांगायला ते कमी करणार नाहीत. काल १२ खासदारांचा जो फुटीर गट भाजपच्या प्रेरणेने सोडून गेले. कोणत्या मजबुरीने  त्यांनी आम्हाला सोडले माहीत नाही. राजकीय कारण अजिबात नाही. प्रत्येकाची एक वेगळी मजबुरी आहे आणि काही कारण आहे. बाकी हिंदूत्व केवळ तोंडिलावायला आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय