शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

NCP प्रमुख शरद पवार उद्योजक गौतम अदानींना का भेटले?; जयंत पाटलांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 08:13 IST

शरद पवारांनी नेहमी इंडिया आघाडीकडून घेतलेल्या निर्णयांचे समर्थन केले आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र करण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार आणि उद्योजक गौतम अदानी यांच्या भेटीनं महाराष्ट्रसह दिल्लीत विविध चर्चांना उधाण आले आहे. शनिवारी अहमदाबाद येथील अदानींच्या घरी ही भेट झाली. ज्यावरून भाजपाने इंडिया आघाडी आणि काँग्रेसला टोले लगावले आहेत. त्याचसोबत राहुल गांधींनाही घेरले आहे. कारण सातत्याने अदानींची भाजपाशी जवळीक असल्याचा आरोप केला जातो. शरद पवार गौतम अदानींना का भेटले? यावर आमदार जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, इंडिया आघाडीत सर्व चर्चा सर्व नेत्यांद्वारे केली जाते. शरद पवार हे गौतम अदानींना ओळखतात, अदानींना एका कार्यक्रमासाठी पवारांना निमंत्रण दिले होते. त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. तो फक्त एक कार्यक्रम होता जिथे शरद पवारांनी उद्घाटन केले. शरद पवारांनी नेहमी इंडिया आघाडीकडून घेतलेल्या निर्णयांचे समर्थन केले आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र करण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

अहमदाबाद इथं एका कार्यक्रमासाठी शरद पवार पोहचले होते. ज्याठिकाणी गौतम अदानींसोबत पवार फित कापताना दिसले. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. इतकेच नाही तर या खासगी कार्यक्रमानंतर शरद पवार गौतम अदानी यांच्या घरी आणि ऑफिसलाही गेले. शरद पवारांनी एक्सवर लिहिलं की, गौतम अदानी यांच्यासमवेत वासना, चाचरवाडी, गुजरात येथे भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवरचे उद्घाटन करणे हे सन्मानास्पद होते असं त्यांनी सांगितले. शरद पवार आणि गौतम अदानी यांची यापूर्वीही दोनदा भेट झाली होती. हिंडनबर्गच्या अहवालानंतर २० एप्रिल २०२३ ला गौतम अदानी यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. तर, दुसरी भेट २ जून २०२३ मध्ये झाली होती. शरद पवार आणि गौतम अदानी यांची गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी भेट आहे.

भाजपा म्हणतं, अदानी शरद पवारांचे मित्र

शरद पवार यांच्या मनात काय आहे? हे कुणी सांगू शकत नाही. ते अंतरयामी आहेत. त्यामुळे मनात, पोटात आणि ओठात काय हे शरद पवार यांनाच माहिती असते. शरद पवार हे गौतम अदानींचे मित्र आहेत. गौतम अदानी हे शरद पवारांची वारंवार भेट घेत असतात. त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :AdaniअदानीSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसBJPभाजपा