शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Belgaum Municipal Corporation Election Results: बेळगावात भाजपाचं 'कमळ' कशामुळे फुललं?... 'हे' आहेत १० ठळक मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 14:55 IST

why Maharashtra ekikaran samiti Lost Belgaum Election? बेळगाव महापालिकेची स्थापना झाल्यापासून या महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते पण हेच निर्विवाद वर्चस्व भाजपने उलथवून टाकले आहे. हा पराभव मराठी अस्मितेच्या जिव्हारी लागणारा आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीतील पराभव मराठी अस्मितेच्या जिव्हारी लागणारा आहे. बेळगाव महानगरपालिका ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ताब्यातून गेली असून आता या महापालिकेवर भाजपची सत्ता असणार आहे. परंतू असे का झाले? एवढी वर्षे ताब्यात असलेली महापालिका कशी गेली? अंतर्गत वाद की आणखी काही, याची कारणे आता शोधावी लागणार आहेत. (Why BJP won in Belgaum Municipal corporation election? see 10 reasons.)

Hubli-Dharwad Election Result: हुबळी-धारवाडमध्ये भाजपाची हॅट्ट्रिक; तिसरी महापालिका काँग्रेसला तारणार?

 बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक आठ वर्षानंतर झाली. यापूर्वी 2013 साठी निवडणूक झाली होती. मात्र, 2018 ला मुदत संपल्यानंतर चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना केल्यामुळे याबाबतचा वाद न्यायालयात होता आणि हा वाद सुरू असतानाच घाईघाईने कर्नाटक राज्य सरकारने ही निवडणूक जाहीर केली. बेळगाव महापालिकेची स्थापना झाल्यापासून या महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते पण हेच निर्विवाद वर्चस्व भाजपने उलथवून टाकले आहे. 

Belgaum Municipal Corporation Election Results: संजय राऊतांचा स्वप्नभंग; ३० जागा जिंकण्याचा होता निर्धार, पण दोनच जागांवर 'महाराष्ट्र एकीकरण'ला आधार

बेळगावात भाजप का जिंकला१.महाराष्ट्र एकीकरण समिती मधील अंतर्गत मतभेद २. इच्छुक वाढल्याने मूळ मराठी मतांत मोठ्याप्रमाणात विभागणी ३.भाजपचे विकास आणि हिंदुत्व हे मुद्दे जनतेला भावले४.भाजप काँग्रेस आप आणि एमआयएम या मोठ्या राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार ५. प्रभागांची पुनर्रचना झाल्यामुळे  मराठी उमेदवारांना फटका ६. कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता. बेळगावमधील आमदार, खासदार भाजपचे; त्यामुळे भाजपने ताकद लावली७. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब८. समितीचे 58 पैकी फक्त 21 जागांवर अधिकृत उमेदवार. त्यामुळेच मर्यादित यश.९. महाराष्ट्र एकीकरण समितीला महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी वेळोवेळी पाठिंबा दर्शवला आहे. पण यावेळी या निवडणुकीसाठी महाराष्ट्रकडून पुरवली जाणारी रसद पडली कमी.१०. महाराष्ट्रातील नेत्यांनी एकीकरण समितीमधील नेत्यांमध्ये जर एकसंधपणा आणायचा प्रयत्न केला असता तर हा पराभव टाळता आला असता. ज्येष्ठ नेते प्रा. एन डी पाटील आजारी असल्याने सर्व नेत्यांना एकत्र करण्यात समितीला अपयश.

टॅग्स :BJPभाजपाbelgaonबेळगावmaharashtra ekikaran samiteeमहाराष्ट्र एकीकरण समिती