शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शिवसेनेच्या नेतृत्त्वातील आघाडीला होता अजित पवारांचा विरोध!; पुस्तकातून खळबळजनक दावा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 25, 2020 18:21 IST

भाजपसोबत येताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय संवाद झाला? हेदेखील या पुस्तकात सांगण्यात आले आहे. यात पवारांनी आपल्यासोबत कोण कोणते आमदार आहेत त्यांची नावेही फडणवीसांना सांगितली होती.

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित येत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावेळी शिवसेनेबरोबर युती करण्यास अजित पवारांचा विरोध होता. त्यांचा हा विरोध नेमका का आणि कशामुळे होता? यासंदर्भात 'ट्रेडिंग पॉवर'पुस्तकात मोठा दावा करण्यात आला आहे. यामुळे, त्यावेळी पडद्यामागे नेमके काय झाले? कुठल्या घटना घडामोडी घडल्या? हे उघड झाले आहे.

प्रियम गांधी या, या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्यांच्या या पुस्तकातून फडणवीस-पवार यांच्या शपथविधीच्या पडद्यामागे नेमके काय घडले यासंदर्भात धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. "अजित पवारांचा तात्विक आणि राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास विरोध होता आणि यामुळेच त्यांनी फडणवीसांबरोबर हात मिळवणी केली," असा दावा या पुस्तकात करण्यात आला असल्याचे वृत्त टीव्ही ९ने दिले आहे.

एका नेत्याचा हवाला देत, या पुस्तकात म्हणण्यात आले आहे, की, "राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा शिवसेनेशी आघाडी करण्याचा निर्णय चुकीचा आहे, शिवसेनेला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होऊ शकते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत होते. एवढेच नाही, तर या निर्णयामुळे आपली राजकीय कारकिर्दही खराब होण्याची भीती अजित पवारांना वाटत होती," असेही या पुस्तकात म्हणण्यात आले आहे. 

या आमदारांचा होता पवारांना पाठींबा - भाजपसोबत येताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय संवाद झाला? हेदेखील या पुस्तकात सांगण्यात आले आहे. यानुसार त्यावेळी अजित पवार यांनी फडवणवीसांना, आपल्याकडे या घडीला 28 आमदार आहेत, मी जे म्हणेन ते ते करतील, तुमच्याकडे असलेले संख्याबळ आणि अपक्ष आमदार यांच्या ताकदीवर आपण बहुमत मिळवू शकू, असे म्हटले होते. यावर फडणविसांनी पवारांना त्या आमदारांची नावेही विचारली होती. तेव्हा अजित पवारांनी, सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील तिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील शिवाय तेरा आणखी, अशी नावे सांगितली होती, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा