शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

'मी कोणा-कोणाचे तोंड धरणार आहे?'; धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:36 IST

Dhananjay Munde Ajit Pawar News: महायुतीच्या सरकारमधील आमदारांसह विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला आहे. त्यात सोमवारी (६ जानेवारी) धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. 

Santosh Deshmukh Dhananjay Munde: संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. सत्ताधारी महायुतीतील आमदारांसह विरोधी आमदार आणि नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे ही मागणी केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी राज्यापालांची भेट घेतली असून, याच दरम्यान धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी भेटीबद्दल आणि या प्रकरणावर भूमिका मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात सोमवारी तासभर बैठक झाली. पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. नवीन वर्षी अजित पवार इथे नव्हते, आज मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. माझ्या खात्याचा सगळा आढावा त्यांच्यासमोर मांडला."

मी कोणा-कोणाचे तोंड धरणार? धनंजय मुंडेंचा धसांवर अप्रत्यक्षपणे पलटवार 

होत असलेल्या आरोपावर धनंजय मुंडे म्हणाले, "या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही. कुणी काय आरोप करावेत, हे लोकशाहीला प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. मी कोणा-कोणाचे तोंड धरणार आहे? माझं म्हणणं आहे की, जे आरोप करताहेत, ते ज्या पक्षाचे आहेत. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा. ते महायुतीत भाजपचे आमदार असतील, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारावं", असा पलटवार धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर नाव न घेता केला. 

मुख्यमंत्र्यांनी तशा चौकश्या नेमल्या -मुंडे

एसआयटीतील अधिकारी वाल्मीक कराडच्या जवळचे असल्याचे समोर आले आहे. या मुद्द्यावर धनंजय मुंडे म्हणाले, "खरं सांगू का? अधिवेशनात ज्या लोकांना मागणी केली होती की, अशी अशी चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तशा चौकश्या नेमल्या आहेत. त्या तपासात, ज्यावेळी माझ्याकडे संशयाने बघितले जाते, त्यावेळी मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही."

"अतिशय व्यवस्थित तपास सुरू आहे. तपास पूर्ण होऊद्या. हे सगळं फेक नरेटिव्ह आहे. मीडिया ट्रायल सुरू आहे. माझं म्हणणं आहे की, कोर्टात ट्रायल होऊ द्या", असे धनंजय मुंडे म्हणाले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवारBeedबीडMahayutiमहायुतीSuresh Dhasसुरेश धस